Monday 30 May 2016

अहिल्याईंच्या प्रशासनाचा अवलंब करा...

माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती
तूच होतीस महान प्रशासनकर्ती
माते तुझी घेऊनिया स्फूर्ति
लढण्यासाठी घेऊन तलवार हाती
आम्हीही उतरतो आता रणांगणावरती.....

एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील एक आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे. पण आम्ही अजूनही अंधारातच आहोत. आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, धर्मशाला, नदीवरील घाट अशी कीतीतरी विकासकामे प्रजेच्या हीतासाठी करणारी पुण्यश्लोक, वेळप्रसंगी प्रजेच्या रक्षणासाठी हाती तलवार भाले घेऊन दुश्मनांच्या चिंधड्या उडवणारी रणरागीणी, राजमाता, महाराणी, लोककल्याणकारी माता अहिल्याई होळकर यांची आज २९१ वी जयंती त्यानिमीत्त माझ्या राजमातेला मानाचा पिवळा जय मल्हार.
जाती धर्माच्या पलिकडे जाऊन प्रजाहितरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या अहिल्याई होळकर यांची जयंती फक्त धनगर समाजानेच साजरी करणे हा खरंतर अहिल्याईंचा अपमान  आहे पण जातीवादाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारत देशामध्ये ही जातावादाची अन् भूरसटलेल्या विचाराची पेरण करून सनातन्यांनी सर्वसामान्यांचे पार कंबरडच मोडलंय. राजमाता अहिल्याई होळकर असो अथवा अन्य कोणी थोर महापुरूष किंवा समाजसुधारक असो यांची जयंती अथवा स्मृतिदीन साजरा करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असताना त्या त्या महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्या मार्गावर चालणे हे समाजाच्या हीताचे आहे. नुसतंच महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करणं, लोकवर्गणीतून हजारो-लाखो रुपये उधळून डी जे लावून धांगडधींगा घालणे हे समाजजीगृतीचे लक्षण नसून समाजाला त्या महापुरूषांच्या विचारांपासून परावर्तित करण्याचे लक्षण आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
राजमाता महाराणी अहिल्याई होळकर यांची प्रशासन पद्धत पाहून, अहिल्याई होळकर यांचा राज्यकारभार आणि प्रशासन याचा अभ्यास करून युरोप खंडांतील देशांनी विकासाचा पल्ला गाठला, शेती, शिक्षण तसेच औद्योगिकरणातून त्या त्या देशांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली पण त्याच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा भारत देश मात्र अधोगतीच्या मार्गावर आहे यासाठी धर्मनिरपेक्षतेचा उगाच आव आणणाऱ्या भारत देशाची जातीव्यवस्था (धर्मभेद, जातीभेद) ही भारताच्या अधोगतीशी कारणीभूत आहे. आजपर्यंत सनातन्यांनी राष्ट्राप्रति सर्वस्व अर्पन करणाऱ्या महापुरूषांचा इतिहास चुकीचाच लिहला  आणि खरा इतिहास मात्र दडवून ठेवला लपवून ठेवला कारण की चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरंतर चुकीचे जन्माला आले होते.
आज धनगर समाज जागा झाला, समाजाला खरा इतिहास समजू लागला उमजू लागला पण समाजाचे भांडवलीकरण करून, समाजाला प्रस्तापितांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेत्यांनी केले म्हणजेच आगीतून उठला अन् फुफाट्यात पडला हीच अवस्था धनगर समाजाची झाली आहे. अरे एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात गुलामगीरीत का वागतेय? हे सांगून सांगून थकलो तरीही धनगर समाज अजून अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय हे समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आणि याच कारणांमुळे धनगर समाजाचा विकास खुंटलाय असं म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
असो आजचा युवक शिकलाय, सवरलाय, अन्यायाच्या विरोधात लिहायला, वाचायला आणि बोलायला लागलाय त्यामुळे कुठूनतरी आशेचा किरण उगवलेला दिसतोय, कुठूनतरी समाजप्रबोधनास नव अंकुर फुटलेला दिसतोय. आजचा युवक स्वाभिमानाची भाषा बोलायला लागलाय. नक्कीच आजचा यूवक हा उद्याच्या भावी पिढीसाठी एक नवा इतिहास रचून जाईल. एक वेळ अशीही येईल की राजा मल्हारराव होळकर यांचे "मल्हारतंत्र" अवगत करून, रणरागीणी अहिल्याई  होळकर यांचा आदर्श आणि एकमेव अद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर यांची दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेऊन सर्व धनगर समाजबांधव, नेते एकत्रित येऊन क्रांती घडवतील हीच आशा मनी बाळगून समाजप्रबोधनासाठी चालू केलेला हा लेखनप्रपंच....
पुनःश्च एकदा राष्ट्रमाता,राजमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त (३१ मे १७२५) त्यांच्या प्रेरणादायी सक्षम विचारांना व समाज उध्दारक दैदिप्यमान कार्याला विनम्र अभिवादन...! मानाचा पिवळा जय मल्हार!! तसेच सर्व समाजबांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्याई!! जय यशवंत!!!
आपलाच
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ती.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday 2 May 2015

महा'राष्ट्र'....

आज १ मे महाराष्ट्र व कामगार दिन..,
गावोगावी तसेच शहरात आणि प्रत्येक विभागात फ्लैक्स वरतून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसला तसेच आज दिवसभर एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्याच फोनवरतून तसेच सोशल मिडीयावरतून शुभेच्छा देण्यात आल्या पण कामगार दिनाच्या शुभेच्छा मात्र  क्वचितच लोकांनी दिल्या.
महाराष्ट्र व कामगार दिनानिमीत्त एकमेकांना शुभेच्छा  द्याव्यात त्याबद्दल माझं काही दुमत नाही पण याव्यतिरीक्त इतर काही गोष्टींचा अभ्यास करुन त्यावरती विचारविनीमय करणे मला तितकच योग्य वाटते. आज प्रामुख्यानं महाराष्ट्र दिन पण "महाराष्ट्र" हा शब्द नक्की आला कोठून त्याचा थोडक्यात आढावा घेवूया...
खरंतर महाराष्ट्र या शब्दाची सुरवात मरहट्टी या शब्दापासून होते. कर्नाटक मधील मरहट्टी लोक (म्हणजेच शेळ्या-मेंढ्या पाळणारे पशुपालक) त्यांना हट्टीजन म्हणून ओळखले जाते. कन्नड मधील हे हट्टीजन लोक म्हणजेच शेळ्या मेंढ्या पाळणारा धनगर समाज आहे आणि हे मरहट्टी जी भाषा बोलायचे त्यांस "मरहट्टी" भाषा व कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन मरहट्टी चा "मराठी" हा प्रचलित शब्द तयार झाला. हट्टीजनांचे म्हणजेच धनगरांचे राष्ट्र (मरहट्ट्यांचे राष्ट्र = महाराष्ट्र) उदयास आले. पूर्वीच्या सातवाहन या धनगर जमातीचा या राष्ट्राच्या जडण-घडणीत सिंहाचा वाटा असल्याने हे धनगरांचे राज्य निर्माण झाले व मरहट्ट्यांची मरहट्टी भाषा तसेच मरहट्ट्यांचे राष्ट्र (धनगरांचे राष्ट्र) निर्माण झाले.
महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई हा प्रांत महाराष्ट्र राज्यात यावा म्हणून ज्या १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं गेलं त्या शहिदांना विनम्र अभिवादन करतो पण स्वतंत्र महाराष्ट्र स्थापण करुन माझ्या मरहट्टी (मराठी) बांधवांना महाराष्ट्राच्या छाताडातून वेगळं केलं गेलं याचंच दु:ख मनोमन होतंय. सदरच्या मध्यप्रदेश राज्यातील इंदौर हे संस्थान जिथं माझे मरहट्टी बांधव वास्तव्य करत असताना स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीनंतर त्यांना मध्यप्रदेशात रहावं लागतंय आज तिथे मराठी भाषा वापरणारे वास्तव्य करताहेत त्याशिवाय कर्नाटकमधील माझ्या बांधवांनादेखिल महाराष्ट्रापासून अलिप्त ठेवण्यात आलं मग आज महाराष्ट्र दिनानिमीत्त मी आनंद साजरा करू की दु:ख व्यक्त करु या संभ्रमात रहावं लागतंय. म्हणून शुभेच्छा द्यायच्या की नाहीत हे कोडं पडलं आहे.
मी मराठी असा डंका पिटणार्या आणि मराठीचा (मरहट्टीचा) उदो 'उदो' करून 'राज'कारण करणार्या त्या परप्रांतीयांना  माझ्या मरहट्टीची(धनगर समाजाची) ताकद काय कळणार?? मी मराठी मी मराठी असं तोंड वरती वरून सांगताहेत पण माझ्या मराठी (मरहट्टी=धनगर) बांधवांना आरक्षण द्यायची वेळ येते त्यावेळी त्यांच्या म्हणजेच मी मराठी (मी मरहट्टी=मी धनगर) बोलणार्यांच्या तोंडातून ब्र देखिल निघत नाही तसेच या मरहट्टी समाजाला आरक्षण मिळू अशी भाषा करणारे ते भट आणि त्या प्रस्थापित जाती आहेत मग जनतेला तुम्ही किती दुधखुळं बनवता याचा अंदाज तुम्हाला येत नाही. माझ्याच मरहट्टी च्या नावावर राजकारण करू इच्छिनार्यांना २०१४ च्या निवडणूकांमध्ये पराभवाची धूळ खावी लागली ती मराठी (मरहट्टी =धनगर) समाजामुळेच...
महाराष्ट्र राज्यातील परिणामी भारतातील क्रमांक एक वरती असलेल्या धनगर समाजाला अजून स्वतःची ताकद काय आहे याचा अंदाज आलेला नाही. फक्त महाराष्ट्र राज्यात एकूण ५२ पोटजातींमध्ये धनगर समाजाची विभागणी झाल्याने खरी धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे याचे अनुमान काढणं तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत अनेक पोटजातींमध्ये विभागलेला मरहट्टी म्हणजेच धनगर समाज एकत्रित येत नाही. पण या राज्यकर्त्यांनी  मी मराठी मराठी करून काय दिवे लावले होते हे तर सर्वांना ज्ञात आहे. उलट माझ्या मरहट्टी समाजावरती घोर अन्याय केला आहे. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी लढलेले १०५ हुतात्मे हे मरहट्टीच होते पण त्यांच्या कुटूंबीयाकडे देखिल दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसून येते पण राज्यकर्त्यांना डिंडोरा पिटण्याशिवाय दुसरे तिसरे उद्योग नाहीयेत स्वताचे नाव झालं म्हणजे बस् बाकीचे कसे का असेनात अशी त्यांची वृत्ती दिसून येते संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात मरहट्टी (मराठी) असलेल्या धनगर समाजाची लोकसंख्या अव्वल स्थानावर असून देखिल प्रस्थापित भट जातींनी मरहट्टी लोकांना वरती येवू दिले नाही म्हणजेच हापापाचा माल गपापाला असंच म्हणायची वेळ आली आहे.

         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 30 April 2015

समानता आणि हक्क...तसेच विषय आरक्षणाचा...

समानता असायला हवी असं प्रत्येकजण म्हणतो अगदी मी सुद्धा.. पण आज भारत देशात  ते खरंच संभाव्य आहे का ??? याची पडताळणी करायला हवी. धनगर समाजासाठी ST आरक्षण कीती फायदेशीर आहे?? आणि कीती नुकसानदायक आहे?? यावरती एका धनगर बांधवांसोबत चर्चा करताना "समानता" यावर देखिल चर्चा करण्यात आली. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि आम्ही सर्व एक आहोत असे अभिमानाने सांगता तर मग दलित बांधव असोत अथवा इतर मागास वर्गीय  (भट जाती आणि प्रस्थापित घराणेशाही सोडून इतर) समाजावरती अन्याय का होतोय ते मला कळेल का??
महाराष्ट्रपुत्र डॉ भाऊसाहेब उबाळे [मुळ गाव वडगाव (जयराम स्वामी) ता कराड जि सातारा त्यांचा जन्म १९३६ साली बावची येथे झाला],कनाडा देशाचे ते मानवी हक्क अधिकार साठी कार्यरत असणारे व कनाडा देशाचा "Order of Ontario" हा सन्मान मिळवणारे एक जिगरबाज समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. ("Order of Ontario":-Awarded for Demonstrations of excellence
in any field or outstanding
contributions to society in
Ontario and elsewhere)
1975 मध्ये लंडन मधील University of Bradford मधून त्यांनी Phd  मिळवली होती. पण तिथे गोरा आणि काळा असा वर्णभेद असल्यामुळे लंडन मध्ये त्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत असे म्हणून डॉ भाऊसाहेब ऊबाळे यांनी कनाडा मध्ये मानवी हक्क अधिकाराचे कमिशनर असताना तिथे सर्व देश-विदेशातील नागरिकांसाठी समानतेचे हक्क आणि कायदे तयार केले. कनाडा मध्ये समानता(Equality) असायला हवी होती आणि म्हणून कनाडा सरकार ने त्यांना "Order of Ontario" या पुरस्काराने सन्मानित केले.
तद्नंतर भाऊसाहेब उबाळे भारतामध्ये आले असता त्यांनी स्थानीक नेत्यांसोबत समानतेबद्दल(Equality) चर्चा केली पण भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील  शिक्षण सम्राट तसेच साखर सम्राट असलेल्या प्रस्थापित घराणेशाहीतील नेत्यांनी (जे तुमचे आमचे राजकीय आणि सामाजिक शत्रु आहेत त्यांनी) त्यांचे हसू उडवले. प्रस्थापितांच्या असल्या धोरणामुळे एक सच्चा देशभक्त आणि समाजसेवकाला पुन्हा कनाडा मध्येच आयुष्य समर्पित करावं लागलं.

भारतामध्ये जर समानता(Equality) हे धोरण राबवायचे असेल तर काही असंभव गोष्टी निर्णायक ठरतील... मग आरक्षण हा देखिल मुद्दा वादाचा ठरू शकतो.
आज धनगर समाज ६७ वर्ष झाली ST च्या सवलतीपासून वंचित आहे आणि त्यांना यापासून वंचित ठेवायचं काम भटांनी व प्रस्थापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांनी केलं आहे आणि आजही करत आहेत. मग हा समाज आदिवाशी तसेच इतरांसारखाच अजूनही मागासलेला आहे मला सुद्धा समानता असावी असं वाटणं साहजिक आहे, पण जर समानता राबवायची असेल तर
१)कोणत्याही जाती धर्मास कोणत्याही क्षेत्रात जे आरक्षण आहे ते आरक्षण माघारी घ्यावे लागेल.
२) शिक्षण बाबतीत सर्व जाती धर्मांना परवडणारे शैक्षणिक शुल्क समान करावे लागतील.
३) राजकारण(politics) मध्ये सर्वांना समान संधी द्यावी लागेल.
४) सर्व शिक्षण संस्था तसेच साखर कारखाने व उद्योगधंदे भारत सरकारच्या अखत्यारित आणावे लागतील.
५) स्वजातीय तसेच पाहुण्या रावळ्यांचे बस्तान बंद करायचे असेल तर खाजगी प्रकल्प तसेच उद्योगधंदे भारत सरकारच्या स्वाधीन करावे लागतील मग त्यावरती कोणाचीही मालकी राहणार नाही.
पण याची दुसरी बाजू सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात...
जर समानता राबवली तर...
१)शैक्षणिक शुल्क जरी सर्वांना परवडणारे आणि समान असले तरी शिक्षण सम्राटांचे नातेवाईक या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेतील मग इतर समाजाचं काय???
२) सर्व शिक्षण संस्था आज प्रस्थापित नेत्यांच्या आहेत तिथं गोरगरीब तसेच दलित बांधव असोत अथवा चांभार, कुंभार, ढोर, न्हावी, साळी, तेली, कोष्ठी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, कोळी, परीट, लोणारी इ. या अठरा पगड जातींना शिक्षणापासून पुन्हा वंचित राहावं लागेल.
३) उद्योगधंदे तसेच साखर कारखाने हे देखिल प्रस्थापित घराणेशाहीकडे असल्याने त्यांचे निकटवर्तीय याचा लाभ घेतील मग बाकीच्या तळागळातील गोरगरीबांचा कोण विचार करणार??
४)मर्यादित विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यायचा असेल तर मग आज गुणवत्ता यादीत येणारे क्वचिचत इतर मागासलेल्या समाजातील आहेत त्याव्यतिरीक्त सर्वच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे गुणवत्ता यादीत आघाडीवर आहेत . कारण इतर मागासलेला समाजवर्ग शिक्षणासाठी आवश्यक तितका खर्च करू शकत नाही.

समानता असायला हवी असं प्रत्येक नेता/विधानसभा सदस्य अवर्जून सांगेल पण त्यासाठी अगोदर सर्व शिक्षण संस्था, कारखाने उद्योगधंदे तसेच अनेक खाजगी प्रकल्प  भारत सरकारच्या स्वाधीन करावे लागतील तद्नंतर भारतीय प्रशासन व्यवस्था यावरती नियंत्रण ठेवेल.
पण यासाठी तेच नेते जे संत्री/मंत्री अर्थात शिक्षण सम्राट व साखर सम्राट विरोध करतील. मग त्यांना समानता नको आहे मग आपणच का उदो उदो करत बसायचे...
यासाठी डॉ बाबासाहेबांनी बाकीच्या देशातील संविधानांचा अभ्यास करुनच प्रत्येक समाजाला हक्क आणि अधिकार संविधानात दिले आहेत तसेच कायदे आणि व्यवस्था सुरळीत चालावी म्हणूनच आरक्षण ही चौकट निर्माण केली आहे.नाहीतर आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांनी इतर मागास वर्गीय समाजाला आर्थिकदृष्ट्या कमजोर असणार्या समाजाला जनावरासारखी वागणूक दिली असती.
म्हणून अगोदर आम्हाला आमचे हक्क ST आरक्षण  पाहिजे तरच आम्ही भटांच्या पंगतीला बसू शकतो अन्यथा वेशीच्या खालतं ज्या धनगर समाजाच्या वाड्या(वस्त्या) आहेत त्यामध्ये काहीच आणि कधीच सुधारणा होणार नाही. जिथं सामान्य जनतेला आणि मागासलेल्या समाजाला आपले हक्कच मिळत नसतील तर मग समानतेचे गुण गाणं कितपत योग्य आहे???

          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday 22 April 2015

पुन्हा एक नवी दिशा....

⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨
अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारे अडाणी कसे काय राहिले याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी  कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते.  इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूप उशीर झाला.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का???  दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या  अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
 एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव नाही भासली पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील हे सांगायला कोणाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 17 April 2015

आतातरी परिवर्तन घडवायचं का??

 मी आमक्याचा तर तू तमक्याचा,
मी इकडचा तर तू तिकडचा,
एकमेकांना बरबाद करून अन्
एकमेकांचे धिंदोडे काढून
असंच सदैव बोंबलत बसायचं का???
बांधवांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??

मी जानकर साहेबांचा तर
तू पडळकर साहेबांचा,
अन् मी आवारे साहेबांचा तर
तू प्रकाश आण्णांचा,
असंच आयुष्यभर लढत बसायचं का??
बांधवांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??

सुवर्णाक्षरातील इतिहास विसरून,
आपल्यातल्या आपल्यातच लढून,
एकमेकांची डोकी फोडून,
नाती रक्ताची सहज तोडून,
कुल्हाडी कोयत्यानं लढायचं का??
बांधवांनो परिवर्तन आतातरी घडवायचं का??

स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून,
कोणाचीतरी चमचेगीरी करुन,
समाजाचं वाटोळं करत
याचं थोडं अन् त्याचं थोडं करत,
दुसर्यांच्या गुलामगीरीत जगायचं का??
बांधावांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??
सांगा मला आतातरी परिवर्तन घडवायचं का??

जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com
धनगर समाजाची ओळख सांगायची म्हणलं तर चंद्रगुप्त मौर्य पासून राजा सम्राट अशोक ते होळकरशाही अन् आजचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर अर्थात आपले लाडके आप्पा.
धनगर समाजानं जर मनात आणलं तर क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं पण आजचा धनगर समाजबांधव मात्र व्हाटसप वरतीच भांडत बसलाय.  लाज वाटतेय माझी मला अरे ज्या विस्कटलेल्या धनगर समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जातोय तेच धनगर समाजबांधव आज व्हाटसप वरती एकत्रित येवून एकमेकांत भांडत आहेत. धन्य आहे बुवा...
एक कट्टर समाजप्रेमी संतोष बिचुकले सर समाजप्रबोधन करत असताना जय मल्हार युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी त्यांना व रासप च्या कार्यकर्त्यांना काल ग्रुपवरतून रिमूव्ह केले.
का केले कशासाठी केले हे सांगायची गरज पडणार नाही, मी कोणत्याही पक्षाचा समर्थक अथवा कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता/सभासद नाही पण अखंड धनगर समाजात जागृति निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय.
कालच्या प्रकारावरुन असं दिसून येतंय की समाजप्रेमींचे विचार दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे जर सत्य समोर मांडलं तर ते खूपतंय असं म्हणलं तरी हरकत नाही. जर एखाद्या नेत्याचं अथवा लेखकाचं चुकत असेल तर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देणं गरजेचं आहे. एखादा विचार मांडला असेल तर त्याचे उत्तर वैचारिक लढाई लढूनच दिले पाहिजे. जर एखादा लेखक अथवा समाजप्रेमी आपली बांजू मांडत असेल तर त्यावरती बरोबर की चूक अशी चर्चा देखील व्हायला हवी, पण जर तुम्ही त्या समाजप्रेमीला ग्रुपवरतून रिमूव्ह करत असाल तर याचा अर्थ असाच होईल की "सत्य हे नेहमीच कडू असते" म्हणजे ती व्यक्ति चांगलं समाजकार्य करत असताना त्या व्यक्तीचे समाजहिताचे विचार तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करताय. असल्या कृत्यामुळे धनगर समाज आणि परिणामी तुम्ही कधीच पुढे येवू शकणार नाही, उलट अजून ५-५० वर्षे पाठीमागे जाणार हे मात्र नक्की.
तुम्ही कोणत्या पक्षात अथवा संघटनेत काम करता ते महत्वाचे नाही तर तुम्ही माझ्या धनगर समाजासाठी काय करता है महत्वाचं आहे. त्यासाठी एकमेकांचे विचार समजून घ्या आणि कुठेतरी एकत्रित या नाहीतर मग मागलं तसंच म्होरलं असाच प्रकार दिसून येईल.
तसेच परिवर्तन होतंय की परावर्तन होतंय हे कळणार नाही मग तुम्ही कोणाचेतरी बर्तन घासत बसणार हे मात्र नक्की..
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday 11 April 2015

सत्य नेहमी कडूच असतं...
आज खरं सांगायला गेलो तर लोकांना बरं वाटत नाही अन् बरं सांगायला गेलो तर खरं वाटत नाही. मग खरंबरं करत कुरबुर व्हायला सुरवात होते. अर्थातच सत्य हमेशा परेशान होता है/करता है। असंच सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून धनगर समाजावर सतत अन्यायाचीच कुर्हाड कोसळत आली होती आणि आजही तोच प्रकार आहे. स्व बी के कोकरे साहेबांनी ती अन्यायाची कुर्हाड सावरायचा प्रयत्न करुन बारामतीतून धनगर समाजाला "यशवंत सेना" या संघटनेखाली एकत्रित आणले, पण शरद पवारांच्या मनात पाल चुकचुकली की जर धनगर समाज बी के कोकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाला तर मग भविष्यात आपल्याला राजकारण करता येणार नाही. बी के कोकरे साहेबांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने पवारांनी काट्यानं काटा काढायचा हा डाव आखला आणि आर्थिक बाबतीने समृद्ध असलेल्या  धनगर समाजातीलच स्व.शेंडगे बापूंना जवळ केले. ही सत्य परिस्थिति समाजासमोर मांडली म्हणजे आम्ही काही गुन्हा केला का?? कारण त्यावेळची अशी परिस्थिति पुन्हा उद्भवू नये हा त्या पाठीमागचा उद्देश्य आहे.
आज जे धनगर नाहीयेत असे लोक मला आर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करताहेत त्या भामट्यांना छाती ठोकपणे सांगतो की बाबांनो ज्यांनी धनगर समाजाची दिशाभुल करून समाजाचं वाटोळं केल त्याबद्दल मी माझं मत मांडलं होतं आणि आपली बाजू स्वतंत्रपणे मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार देखिल आहे. जर तुमची बाजू स्ट्रॉन्ग असेल तर तुमचं मत तुम्ही मांडू शकता. आर्वाच्च भाषा वापरून आणि घाणेरड्या शिव्या देवून तुम्ही तुमच्यावरती झालेले आई-वडिलांचे संस्कार इतरांना दाखवून देताय हे विसरु नका. मग माझी लायकी काढण्यागोदर तुम्ही स्वतःची लायकी तपासून पहा.
तुम्ही फोन करून सांगताय की आमच्या नेत्यावर टीका करु नका, चांगली गोष्ट आहे. धनगर समाजाच्या कोणत्याही नेत्यावर मी टीका करणार नाही पण जर माझ्या धनगर समाजाचं नाव घेवून जर कोणी बारामतीच्या बोक्याचं तळवे चाटत असेल तर त्याला समाजासमोर उघडा नागडा केल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या धनगर समाजावरती काय अन्याय होतोय ते पहायचं असेल तर धनगर समाजात जन्माला या.
मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही, कोणत्याही संघटनेचा सभासद देखिल नाही अन् कोणत्या नेत्याचा दलालही नाही. कोणत्या नेत्याकडून मी चहाची देखिल अपेक्षा करत नाही पण जे बाजारबुणगे धनगर समाजाची चमचेगीरी करुन धनगर समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम करताहेत त्या त्या नेत्यांनी एकतर आपले विचार बदलावेत नाहीतर राजकीय सन्यास घ्यावा कारण माझ्या धनगर समाजाचं नाव घ्यायचा देखिल अधिकार त्यांना नाही.
मला फोन करून अथवा मेसेज पाठवून धमक्या द्यायचं बंद करा. असल्या फालतु आणि पोकळ धमक्यांना मी कधी घाबरत नाही. आणि असल्या धमक्यांना घाबरून मी माझं समाजकार्य सोडणार नाही. मी एखादा निर्णय घेत असेल तर मागचा-पुढचा विचार करूनच निर्णय घेतो. त्यानंतर मग आर या पार पुढे काय प्रसंग उद्भवतील याचीही मला जाणीव आहे आणि त्यावरती उपाय सुद्धा आहेत. असे निर्भीडपणे आपले मत मांडायला हिम्मत तर लागतेच पण तेवढी धमक देखिल असायला हवी. एखाद्या पालतू कुत्र्यानं सांगाव की आमुक-आमक्या नेत्यावर टीका करु नका, बाकी कोणावरही कर. पण जर डोळ्यादेखत माझ्या समाजाचं बाजारीकरण आणि वाटोळं होत असेल तर मुग गिळून गप्प बसायला मी काय गांडूची औलाद नाही हे तुम्ही विसरु नका. समाजाला योग्य दिशा द्यायचं काम माझ्यासारखेच भरपूर विचारवंत करताहेत आणि त्यांना सुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागतोय. आज समाजामध्ये जागृति झाली आहे त्यामुळे दलालांना समाज चांगलाच ओळखून आहे. माझ्या विचारामुळे  याचे काय परिणाम होतील हे तुम्ही मला सांगत बसू नका कारण लहानपणापासूनच मी परिणाम झेलत आलोय त्यामुळे परिणामाची भाषा मला शिकवू नका. तुमची असभ्य भाषा ऐकुण देखिल मी सभ्यपणे तुमच्याशी संवाद साधत असेल तर त्याचवेळी तुम्हाला अक्कल यायला हवी होती तरीपण तुम्ही जर शिव्या देवून मला धमक्या देत असाल तर मग माझा सळसळत्या रक्ताचा अन् अहिल्येच्या भक्ताचा धनगरी हिसका दाखवायला मला क्षणाचाही वेळ लागणार नाही.
सर्व गोष्टीचा अंत म्हणून धनगर शांत आहे. तर तुम्ही आमचा अंत बघू नका नाहीतर....याद राखा...
खबरदार....!!!
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com