Friday, 17 April 2015

आतातरी परिवर्तन घडवायचं का??

 मी आमक्याचा तर तू तमक्याचा,
मी इकडचा तर तू तिकडचा,
एकमेकांना बरबाद करून अन्
एकमेकांचे धिंदोडे काढून
असंच सदैव बोंबलत बसायचं का???
बांधवांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??

मी जानकर साहेबांचा तर
तू पडळकर साहेबांचा,
अन् मी आवारे साहेबांचा तर
तू प्रकाश आण्णांचा,
असंच आयुष्यभर लढत बसायचं का??
बांधवांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??

सुवर्णाक्षरातील इतिहास विसरून,
आपल्यातल्या आपल्यातच लढून,
एकमेकांची डोकी फोडून,
नाती रक्ताची सहज तोडून,
कुल्हाडी कोयत्यानं लढायचं का??
बांधवांनो परिवर्तन आतातरी घडवायचं का??

स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून,
कोणाचीतरी चमचेगीरी करुन,
समाजाचं वाटोळं करत
याचं थोडं अन् त्याचं थोडं करत,
दुसर्यांच्या गुलामगीरीत जगायचं का??
बांधावांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??
सांगा मला आतातरी परिवर्तन घडवायचं का??

जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment