Thursday, 26 February 2015

.....तर राजीनामा द्या.

आदरणीय प्रकाश आण्णा शेंडगे,
मुंबई येथे १८ मार्च रोजी धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी मोर्चाचे आयोजन केले आहे असं तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं. ही बातमी वाचून तसा म्हणावं तसं उत्साहित नाही झालो. प्रकाश आण्णा चांगली गोष्ट आहे की समाजासाठी तुम्ही धडपडताय, तुम्हाला समाजाचा खूप पुळका येतोय, समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय तुम्हाला जेवणातला एक घास देखिल गिळणार नाय.
प्रकाश आण्णा मी तुम्हाला विरोध करतोय अशातला विषय नाही किंवा मी तुमचा पाय ओढतोय यातलाही विषय नाही. आज तुम्ही माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे म्हणजेच आदरणीय बांपूंचे वारसदार आहात पण सद्याची परिस्थिति अशी आहे की तुमच्याकडे अथवा रमेश(भाऊ) शेंडगे यांच्यापैकी आज कोणाकडेच आमदारकी देखिल नाही. खरंतर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी तुमची आमदारकी गेली त्यावेळी तुम्हाला समाज आठवला का?? बापूंनी समाजासाठी कीती संघर्ष केला होता याचा तुम्हाला विसर कसा काय पडला होता??? ज्या बापूंच्या जीवावर बारामतीचा बोका अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला. आदरणीय स्व बापूंनी ज्या माणसाचं बोट धरलं अन सांगितलं की हा तुमचा नेता आहे. पण त्या माणसानं धनगर समाजाचा फक्त वापरच करून घेतला याची जाणीव कशी काय नाही झाली??? ज्या माणसानं आजपर्यंत धनगर समाजाला फसवायचं काम केलं त्या माणसाकडून विधानसभेचं तिकीट मागताना तुम्हाला माझा धनगर समाज आठवला नव्हता का?? खरंतर तुम्ही आमदार असताना विधानसभेत कीतीवेळा धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल मुद्दा उपस्थित केला??? आज आमदारकी गेल्यानंतर धनगर समाजाचा तुम्हाला कसा काय पुळका आला?? आज तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवताय यात तुमचा काही स्वार्थ तर नाही ना???
प्रकाश आण्णा जर तुम्हाला निस्वार्थीपणे धनगर समाजासाठी लढायचे असेल आणि खरंच तुम्हाला धनगर समाजाचा पुळका असेल तर तुम्ही
"आजच पत्रकार परिषद बोलावून राष्ट्रवादीला राजीनामा द्या". अन पिवळा झेंडा खांद्यावर घ्या.
आण्णा जर तुम्ही राष्ट्रवादीला राजीनामा दिला अन पिवळ्या झेंड्याच्या खाली एकत्र आला तर येत्या १८ मार्च ला १८ लाखांच्या वरती धनगर समाज मुंबई मध्ये एकत्रित आणायची जबाबदारी माझी हे माझे ओपन चैलेंज आहे.
आपलाच समाजबांधव
      नितीनराजे
@जागा हो धनगर

Tuesday, 24 February 2015

समाजाला झोपूद्या ना झोपलाय शांत...

झोपलाय हो माझा धनगर समाज शांत झोपूद्या. गाढ निद्रावस्थेत निपचित पडलाय उगाच डवचू नका. कशाला उगंच बोंबाबोंब करताय?? अहो ज्याला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार आहेत???
उगाच व्हाटसप वरतून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे??? जिथं स्वाभिमान गहाण टाकून प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आणि प्रस्थापितांचे बुट चाटायची सवय लागलेल्या समाजातील दलालांना कीती समजावून सांगणार??? त्या दलालांना स्वतःच्या स्वारथासाठी समाजाचे बाजारीकरण करायचं एवढंच माहीत आहे. त्यांना पैशाची तलप लागली आहे मग ते प्रस्थापितांकडुन लाखो रुपये घेवून येतात अन शे-दोनशे रूपये देवून सर्वसामान्य जनतेला आणि दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवलेल्या गोरगरीब समाजाला भुलवायचं काम करताहेत.
आम्ही मात्र व्हाटसप वरती समाजाला एकत्रित करण्याच्या बढाया मारतोय.
पण दिवसेंदिवस समाजाला भुलवणारे दलाल मोठे होत चाललेत अन रानमाळावर दगड-धोंड्यातून काटे-कुटे तुडवणारा माझा माय-बाप अजून अज्ञानीच आहे. त्यांना खरं राजकारण माहीत नाही. मग व्हाटसप आणि फेसबुक वरतून आम्ही समाजात काय परिवर्तन करू शकतो.???
जिथं लोकांची मनं बदलली जात नाहीत तिथं आम्ही  काय बदल घडविणार??? आज धनगर समाजाला एकमेकांच्या विरोधात लढायला प्रवृत्त केले जाते तिथं माझ्या धनगर समाजाला कधीच वरती येवू द्यायचं नाही हा प्रस्थापितांचा उद्देश्य आमच्या ध्यानात कधी येणार??? अरे पण प्रस्थापितच नव्हे तर आज धनगर समाजातीलच वरीष्ठ नेते एकमेकांची जिरवण्यासाठी राजकारण करताहेत कीती लज्जास्पद बाब आहे ही.
मला त्यांची नावे घ्यायची नाहीत अन त्यांना कळालेही असेल.
आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी असला तर प्रत्येकाला वाटतंय आरक्षण मिळावं पण त्याचं श्रेय स्वतःच्या पारड्यात पडावं ही कटूनीती धनगर समाजातील नेत्यांची झाली आहे त्यामुळे प्रस्थापितांना दोष देण्यात अर्थ नाही. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही म्हण माझ्याच धनगर समाजातील नेत्यांना वापरावी लागेल. मग तिथं कोण लहान असेल अथवा मोठा.
धनगर समाजातील नेत्यांना वाटत असेल की धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे तर ज्या पक्षात ज्या संघटणेत आज तुम्ही समाजाची चमचेगीरी करताय त्या त्या पक्षाचा तुम्ही राजीनामा द्या अन पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून मंत्रालय गाठा तुम्हाला आरक्षण कोण देत नाही तेच बघतो.
मग कोणी भाजपचा असेल शिवसेना, माकप, भाकप, शेकाप, राष्ट्रवादी असेल कोंग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असो शिवसंग्राम असो जनसंग्राम असो अथवा जनता दल असो त्या त्या पक्षातील धनगर समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे की जर तुम्ही धनगर असाल आणि जर तुमच्या नसात धनगरांचं रक्त सळसळत असेल तर प्रत्येकांनी राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या नाहीतर आरक्षणाच्या फालतू आणि पोकळ बडबड करत बसू नका.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
आपलाच समाजबांधव
      【नितीनराजे】
@【जागा हो धनगर】

Monday, 23 February 2015

ओळख माझ्या समाजाची...

धनगर समाज म्हटलं की शेळ्या-
मेंढ्या राखणार्या मेंढपाळाचं म्हणजेच धनगराचं चिञ
डोळ्यासमोर उभं राहतं.
एवढीच आमची ओळख आहे का??? याचा विचार
कधी धनगर समाज बांधवांनी केला आहे का??? जर
विचार केला असेल तर कशा प्रकारे केला ???
आणि नसेल तर का नाही केला??? हे प्रश्न
एकापाठोपाठ एक डोक्यात थैमान घालतात तेव्हाच
सर्व प्रश्नांची उत्तरेदखिल आपोआप येतात.
शेळ्या-मेंढ्यांची राखण करणं एवढीच धनगर
समाजाची ओळख नसून उत्तम प्रशासक आणि शूरवीर
अशी देखिल आमची ओळख आहे.
५००० वर्षापूर्वी अक्षरांचा शोध धनगरांनीच
लावला, इंडोनेशिया मध्ये लोहचुंबकाचा शोध देखिल
धनगरांनीच लावला. आद्य सम्राट राजा चंद्रगुप्त
मौर्या पासून, राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोक,
राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याबाई
होळकर, राजे यशवंतराव होळकर रणरागिणी भिमाई
होळकर यांचेपर्यंत ३५० वर्षं धनगर समाजाने या देशावर
राज्य केलं. एवढंच नव्हे तर "माउंट एवरेस्ट" सर
करणारी पहिलीच महिला धनगर समाजाची आहे.
अशी आहे आमची ओळख.
मुक्या जनावरांची तहान-भूख
जाणणारी अशी आमची जात आहे. मग तुम्ही तर
चांगली चालती-बोलती माणसं, तुम्ही फक्त हातात
हात द्या येणाऱ्या ५ वर्षांत कोणीही सुशिक्षित
बेरोजगार युवक शोधून सापडणार नाहीत
अशी व्यवस्था निर्माण करायला क्षणमात्र वेळ
लागणार नाही.
पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून आज भरपूर प्रमाणात
युवा वर्ग मुंबई-पुणे
यांसारख्या ठिकाणी नोकरीसाठी बाहेर
पडला ही एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल.
पण ज्या मुलांना शेळ्या-मेंढ्या राखत
असताना परिस्थीतीची जाणीव झाली ती मुलं आज
चांगल्या हुद्द्यावरती आहेत. पण बापाच्या पैशावर
एंजोय करणारी पोरं आज ५-१०
हजारांच्या तटपुंज्या नोकरीच्या शोधात फिरताहेत
ही एक खेदाची गोष्ट आहे. शालेय शिक्षणापासूनच
जर मुलांवरती लक्ष्य दिले नाही तर तीच मुले पुढे
भविष्यात हाताबाहेर जातात
याचीही प्रचीती तुम्हाला असेलच.
आई-वडील अडाणी(अशिक्षित) असल्याने
मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष्य देत नाहीत पण
काही अपवाद असेही आहेत की अडाणी जरी असले
तरी ते मुलांकडून अभ्यास करवून घेतात आणि तीच मुलं
शेवटी यशाचे शिखर गाठतात.
(सदरच्या लेखातून मला समाजातील युवक
बांधवांना तसेच
पालकांना त्यांची जबाबदारी समजावून
सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे.)
या व्यतीरीक्त धनगर समाजातील बांधव उद्योजक
म्हणून कमी प्रमाणात ओळखले जातात. ५-१०
हजारांच्या तटपूंज्या नोकर्या शोधत
बसण्यापेक्षा स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे
जायला हवे नाहीतर सकारात्मक दृष्टिकोणातून
कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून छोटे-मोठे उद्योग
धंदे सुरू केले तर धनगर समाजात
उद्योजकांची कमी भासणार नाही. आजकाल जर
एखादा स्थायी बिज़नेस करायचा असेल तर
शासनाकडून मदत होते पण धनगर समाजातील युवक
नकारात्मक विचार करून रीस्क(धोका) घ्यायला पुढे
येत नाहीत. जोपर्यंत रीस्क नावाचा शब्द मनामध्ये
घर करून बसला आहे तोपर्यंत माझा धनगर बांधव पुढे
येणार नाही. धनगर समाजातील युवकांचे जर मनोबल
वाढवले नाही आणि जर
त्यांना एखाद्या गोष्टी बद्दल
प्रेरणा मिळाली नाही तर माझा धनगर समाज
तसाच अंधारात गुरफटून राहील.
 
   -●नितीनराजे●
@ जागा हो धनगर

Sunday, 22 February 2015

शेवटी हारलाय स्वाभिमान....

आज निंबवडे ता.आटपाडी जि. सांगली येथील पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शेतकरी पैनल चा पराभव झाला. खरंतर निंबवडे ग्रामपंचायतीवर पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्चस्व आहे पण  पडळकर साहेब अन जानकर साहेब यांच्यातील गैरसमजूतीमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्यामुळे निंबवडे वि.का.स. सोसायटी गमवावी लागली.तिथं आज ना हरलेत जानकर साहेब नाही हरलेत पडळकर साहेब.
आज हरलाय निंबवडेतल्या प्रत्येक मनामनातला स्वाभिमान.
आरं जिथं स्वाभिमान गहाण टाकला जातो तिथं काय खाक विजयाची अपेक्षा करायची??? आज रासपची हार नाही झाली नाही भाजपची कारण आज इथं फक्त विकला गेलाय स्वाभिमान. आणि आज स्वाभिमान विकला गेल्याने पुन्हा एकदा मक्तेदारीचा विजय झालाय. जिथं मतं विकत घेवून विजयोत्सव साजरा केला जातो, तिथं स्वबळावर लढण्याची त्यांच्यात धमक नसते. आणि स्वबळावर निवडून यायला जिगर लागते अन वाघाचं काळीजही लागतं.
आज जो विजय झाला तो पैशाच्या मस्तीचा अन स्वाभिमान दुसर्यांच्या दारात विकणार्या सर्वसामान्य जनतेचा झाला.
हार पचवायला शिकायचं असतं हे आम्हाला पण माहित आहे, पण जिथं आम्ही स्वाभिमानानं आणि स्वबळावर लढतो तिथं आमची कोणीच हार करू शकत नाही आणि तिथं आम्ही ताठ मानेनं जगतो कोणाच्या गुलामगीरीत नव्हे हेही लक्षात असायला पाहिजे.
-@नितीनराजे

Saturday, 21 February 2015

गरज गैरसमज दूर करण्याची..

निंबवडे गावातील आणि परिसरातील सर्व मतदार बंधू-भगिनींना एक नम्रतेची विनंती.
बांधवांनो आजपर्यंतचं राजकारण कशापद्धतीचे झाले हे देखिल तुम्हा आम्हाला माहीत आहे. आज वि का स सोसायटीच्या निवडणूका तोंडावर येवून ठेपलेत पण आम्ही मात्र अजूनही एकमेकांच्यात भांडतोय. आजपर्यंत ग्रामपंचायत सोसायट्या पंचायत समिति जिल्हा परिषद ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी आपल्या मतदार संघात कीती दिवे लावले याचा जरातरी गांभीर्याने विचार करावा. आज आपण भावा-भावाची डोकी फोडत बसतोय पण आपला हा नंगानाच प्रस्थापित बाबर-देशमुख-पाटलं बघत बसताहेत.
आपल्यातल्या आपल्यातच एकमेकांची डोकी फोडत बसलो तर प्रस्थापितांची घरं भरतील पण आपल्या सर्वसामान्य शेतकर्यांच्या वाट्याला नुसता दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा आला आहे आणि इथून पुढेही तेच होत राहील.
दुष्टाळाच्या खाईत होरपळलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना आज जर स्वाभिमानाने जगायचे असेल तर मा.गोपीचंद पडळकर साहेबांच्या शेतकरी विकास पैनल ला साथ द्यावी.
आपल्यातीलच एक शेतकर्याचा पोरगा
नितीनराजे

Thursday, 19 February 2015

परिवर्तन पाहिजे परावर्तन नको

आटपाडी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे बाबांनो आज आपण २१ व्या शतकात आहोत. आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी (वडिल, आजोबा अन  प्रस्थापितांचे झेंडे वागवले पण आपल्या पदरात नेमकं पडलं तरी काय???
आपले कीती आमदार आले?? कीती खासदार झाले?? हे प्रश्न विचारुन विचारुन वैताग आला आरं आतातरी शहाणं व्हा.
अगोदर तालुक्याचा विचार करा...
आजपर्यंत आटपाडी तालुक्यात देशमुख-पाटलांचे वर्चस्व होते आजपर्यंत वडिलधार्यांनी आजोबा पंजोबांनी त्यांचेच झेंडे वागवले. त्यावेळी आपल्या समाजात एखादा सक्षम नेता नव्हता पण तोही प्रश्न आज सुटलेला आहे.
आज आटपाडी तालुक्यात पडळकर साहेबांचे वर्चस्व आहे. पण जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील गैरसमजामुळे आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाचे विभाजन होत चाल्लय.
नुसत्याच झालेल्या वि का स सोसायटी च्या निवडणुकीत पिंपरी, मिटकी अशा ठिकाणी पडळकर साहेबांच्या अख्ख्या पैनल चा विजय झालेला आहे.
पण जर जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील वैमनस्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर साहेबांऐवजी माजलेल्या देशमुख-पाटलांशी हातमीळवणी करणं हे महामुर्खासारखं आहे.
कदाचित माझे विचार कडवे असतील माझे शब्द मनाला लागतील. पण आजपर्यंतचा इतिहास आठवून बघा की त्या आटपाडीच्या प्रस्थापित गिधडांनी धनगर समाजाचा नुसता वापर करुन घेतलाय.
आज आपण परिवर्तनाच्या दिशेने चाललो असताना देशमुख पाटलांशी हात मिळवणी करणं म्हणजेच आपण पुन्हा एकदा ५० वर्ष पाठीमागे चाल्लोय म्हणजेच परावर्तन होतय असं नाही का वाटत??
पण जानकर साहेबांनी हे पण सांगितले नाही की ज्यांनी तुमचं आजपर्यंत शोषण केलं त्याना साथ द्या असं साहेब कधी बोलले नाहीत अन बोलणारही नाहीत.
मग धनगर समाजाला सत्तेत हिस्सा मिळावा यासाठी सर्व समज गैरसमज बाजूला ठेवून पडळकर साहेबांचे पैनल निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
नाहीतर मागलं तसंच म्होरलं असंच होत राहील मग आपण शिकलो सवरलो नाही असाच त्याचा अर्थ होईल.
आटपाडी तालुक्यामध्ये आज इतर समाजसुद्दा पडळकर साहेबांच्या खाद्याला खांदा लावून काम करताहेत मग माझ्या धनगर समाजातील बांधवांनी थोडाफार विचार करावा की आजपर्यंत आम्ही डोळे झाकून देशमुख पाटलांची गुलामगीरी करत आलो त्याला आज खतपाणी घालण्याऐवजी मुळासकट उखडून टाकुया नाहीतर मग देशमुख पाटलांकडून दारू-मटणं घेवून त्याचीच बुट चाटायची वेळ तुमच्या -आमच्या भाऊ-भावकी, वडिलधारे अन समाजावरती येईल याची नोंद असावी.
     नितीनराजे
@ जागा हो धनगर

Wednesday, 18 February 2015

जय मल्हार योद्ध्यांनो,
मला काही जातीवाद करायचा नाही पण या भारत देशामध्ये जात-पात विरहित आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे ते मला दाखवून द्या आणि जर धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे भारत देशामध्ये चालत असेल तर मी जातीवाद सोडून देतो.
आज ६७ वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून माझ्या धनगर समाजाच्या वाट्याला काय आलं???
एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीचा विचार करुन कीती आमदार विधानसभेत पाठवले ??? कीती खासदार संसदेत पाठवले??? फक्त एवढेच नाही तर नुसत्या महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी धनगर समाजाच्या कीती उमेद्वारांना संधी दिली???
अरे दुसर्यांना काय नावे ठेवायची माझ्याच समाजातील लोकं एकमेकांचे पाय ओढताहेत मग कसा होईल विकास माझ्या समाजाचा??? आज इतिहास घडविण्याच्या गोष्टी केल्या जातात पण जोपर्यंत माझ्या बंधू-भगीनी जाग्या होत नाहीत तोपर्यंत नवीन इतिहास घडविण्याची फालतू बडबड व्यर्थच म्हणावी लागेल.
   आपलाच समाज बांधव
            नितीनराजे
जय मल्हार! जय अहिल्या!!

धनगर समाजाला एकत्र येणे हीच काळाची गरज

         
          खरंतर लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नाही असे म्हणतात पण आज मी हे वास्तवात उतरवायला चाललोय.....
लहानांपासून थोरापर्यंत आणि गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण पिवळ्या झेंड्याखाली यायला वेळ लागणार नाही. आज धनगर समाज जर जागा झाला तर फडणवीस पवार पाटील देशमुख ठाकरेंची पाचावर धारण बसेल. कोणत्याही क्षेत्रात मागचा पुढचा विचार करता कोणत्याही गोष्ठीचे भय न बाळगता नव्या उमेदीने आणि सर्व प्राणपणाणे झटणारा झगडणारा आणि मनात आलं तर सत्यात उतरवणारा फक्त धनगर समाजच आहे.
          एखादी गोष्ट मागून मिळत नसेल तर ती हिसकावून घ्यायची असं जानकर साहेब आम्हाला वेळोवेळी सांगताहेत.
भिक नको सत्तेची सत्ता पाहिजे आमच्या हक्काची. जानकर साहेब तुम्हीच आम्हाला शिकवलं ताठ मानेनं जगायला, तुम्हीच आम्हाला शिकवलं हिमतीनं जगायला. तुम्हीच आम्हाला जागं केलं, झोपेतून उठवलं, चालतं केलं बोलतं केलं त्याचाच परिणाम असा आहे की साहेब आज आम्ही कोणापुढे झुकत नाही. छाती ठोकून सांगतो की आम्ही धनगराच्या औलादी आहोत.
           पण साहेब आज भाजप सोबत तुम्ही युती केली चांगली गोष्ट आहे आपला एक आमदार पण आला आणि बाकीचे सर्व दुसर्या क्रमांकावर आहेत. साहेब तुम्हालाही माहीत आहे आणि आम्हाला ही माहीत आहे की भाजप सरकार आपल्याला आरक्षण नाही देणार.
             साहेब तुम्ही आज ब्राह्मणवादी भाजपची साथ सोडली तर पुढच्या विधानसभेला मुख्यमंत्री आपलाच होईल ही दगडावरची रेष आहे. एस टी गेल्यावर पाठीमागून हात करणारा पश्चिम महाराष्ट्र नाहीये तर दुष्काळाच्या खाइत भाजलेला आणि होरपळलेला पश्चिम महाराष्ट्र आहे. खिशालासुद्दा झळ बसत होती आजही तुमचे तेच कार्यकर्ते निस्वार्थीपणे काम करताना तुम्हाला दिसून येतील  त्यासाठी साहेब तुम्ही तयार केलेल्या हाडाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एक प्रेमाची हाक द्या अन तुमच्यासोबत घेवून चला.
            जानकर साहेब आज पश्चिम महाराष्ट्रातील जनता अजून तशीच दुष्काळाने होरपळली आहे. भाजप राष्ट्रवादीने धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला आहे. आज तुमच्या नेतृत्वामुळे भाजप सरकार सत्तेत आहे याची अख्ख्या महाराष्ट्राला जाणीव आहे. साहेब तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत तयार केलेले तुमचे हाडाचे कार्यकर्ते अजूनही तुमच्याच सोबत आहेत एवढे की एखाद्या मुलीवर प्रेम जेवढे प्रेम करत नसतील तेवढे ते आजही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत. पण साहेब आज गरज आहे त्यांना आपुलकीची आणि आपल्या माणसांची.
साहेब आज तुम्ही OBC बेसवर पक्ष बांधणी केली जनतेनंही तुम्हाला साथ दीली. धनगर समाजाने म्हणावी अशी साथ दीली नाही त्याबद्दल आजही तुम्ही दुखी आहात. पण साहेब जरा मागे वळून पाहा त्यावेळी तुम्हाला ओळखायला कदाचीत धनगर समाजाची चूक झाली असेल. पण आज धनगर समाजाला एकञीत येण्याची नितांत गरज आहे. साहेब तुमच्याच हाताखाली तयार झालेला एक कणखर उमदा धडाडीचा आणि सडेतोड बोलणारा तुमचाच एक हाडाचा नेता मा. गोपीचंद पडळकर साहेबांमुळे आज भाजपची पक्षबांधणी जोरात चालू आहे. सांगली जिल्ह्यात आज भाजप आहे ते तुमच्या कार्यकर्त्यामुळेच.
जानकर साहेब आणि पडळकर साहेब तुमच्यात जे काही गैरसमज झाले आहेत त्यात तुम्हा दोघांची चूक काही नाहीये. कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप मोठी चूक केली मग एकाचे दोन आणि दोनाचे तीन असे करत  एकमेकांबद्दल अफवा उडत होत्या कोणालाच समजत नव्हते की नेमकं काय चाल्लय ते.... जानकर साहेब आणि पडळकर साहेब तुम्ही दोघांनी एकत्र येवून चर्चा करायचा देखील त्रास कोणी घेतला नाही. कारण कार्यकर्त्यांऐवजी तुमची कोणाचीतरी चूक असेलच पण त्यावरती विचारविनीमय झालाच नाही. चूक कोणाची ना कोणाची असू शकते पण त्याची दुसरी बाजू त्या चूकीचे समर्थन करण्यापेक्षा त्यावरती निष्कर्ष काढणे होय. तीच चूक मनात ठेवून एकमेकांचे राजीनामे मागत/देत बसाल तर  मागचं तसच म्होरचं होत राहणार आहे. आज बहुतांशी धनगर समाज पडळकर साहेबांसोबत आहे त्याचे कारण असे की सांगली जिल्ह्यातील मस्तवाल प्रस्थापीत नेत्यांना टक्कर देणारा नेता फक्त आणि फक्त पडळकर साहेबच आहेत. २०१४ च्या विधानसभेत पडळकर साहेबांना जी हार पत्करावी लागली ती जानकर साहेब आणि पडळकर साहेब वेगळे झाल्यामुळेच. मतदारांकडून भावना व्यक्त केल्या जात होत्या की जो जानकर साहेबांचा होऊ शकला नाही तो आमचा काय होणार???
        आज सांगली मध्ये रासप पुन्हा नव्याने पक्षबांधणी करतोय. जानकर साहेबांवरती प्रेम करणारे लोक पुन्हा एकञ येवू लागलेत पण त्याचवेळी पडळकर साहेबाना माननारा वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आज राज्यभर त्यांना माणनारा गट तयार झालाय. आज भाजप राज्यभर पक्षबांधणी साठी पडळकर साहेबांचा वापर करून घेत आहे पण विभाजन होतंय ते माझ्या धनगर समाजाचं होतंय हा बामणी कावा आमच्या कधी लक्षात येणार??"
        एकीकडे जानकर साहेबांमुळे रासप मध्ये धनगर समाज एकत्र येतोय तर दुसरीकडे भाजप मध्ये पडळकर साहेबांमुळे धनगर समाज एकवटतोय. एकीकडे जानकर साहेबांना कैबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली जातेय तर दुसरीकडे पडळकर साहेबांना चांगल्या पदाची ऑफर दिली जातेय. म्हणजे दोघांनाही झुलवत ठेवायचं आणि आरक्षणाचे गाजर दाखवून सत्तेचा मेवा खात बसायचं हे भाजपचे कटूकारस्थान/बामणी कावा माझ्या धनगर समाजाला कधी समजायचा? धनगर समाजात फूट पाडायचा डाव हा फडणवीस पवार पाटील देशमुख ठाकरेंचा आहे.
आज पडळकर साहेब सुद्धा आरक्षणाचा मुद्दा घेवून रणांगणात उतरलेत. आण्णासाहेब डांगे सुद्दा वेगळ्या मार्गाने आरक्षण मागताहेत. सोलापूर मधून मा.अर्जून सलगर तसेच नुसतेच भाजपमधून बाहेर पडलेले मा.प्रकाश आण्णा शेंडगे  पण वेगवेगळे आरक्षण मागत बसलो तर आपल्या पुढच्या कीतीतरी पीढ्या बरबाद होतील पण आपल्याला आरक्षण मिळणार नाही म्हणून मी समाजातील एक छोटासा घटक या नात्यानं विनंती करतो की आजपर्यंत जे काही झालं ते विसरून जावा. कोणाची चूक होती नव्हती ते पण विसरून जावा. मी मोठा होतोय की तू मोठा होतोय हा सुद्दा अहंभाव/अहंकार दोघांनीही मनातून काढून टाका. ज्यांची चूकून चूक झाली असेल अथवा गैरसमज झाले असतील तर ह्रदयांतकरणाने एकमेकांना माफ करा तुमच्या एकमेकांच्या स्वार्थासाठी नव्हे तर धनगर समाजाच्या हीतासाठी पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या.
फक्त पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाचे विभाजन खालीलप्रमाणे होईल ते आपल्याला कळणार नाही पण झळ मात्र बसणार..।
१ मा आमदार महादेवजी जानकर साहेब
२ मा गोपीचंद पडळकर साहेब
३ मा आमदार गणपतराव(आबा) देशमुख
४ मा प्रकाश आण्णा शेंडगे राष्ट्रवादी
५ माजी मंत्री मा अण्णासाहेब डांगे
६ मा अर्जुन सलगर साहेब
७  मा आमदार दत्तात्रय भरणे मामा
८ मा बाळासाहेब(तात्या) गावडे
९  मा उत्तम जानकर
१० मा विश्वास नाना देवकाते
११ रमेश (भाऊ) शेंडगे
१२
१३
*
*
शेवटी धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा असंच म्हणत बसायची वेळ येईल....
वेळीच एकत्र नाही आला तर येणारी पुढची पीढी तोंडात शेण घातल्याशिवाय गप्प बसणार नाही...
एकच नाद घुमूदे
धनगर सारा एक होऊ दे
आपल्यातीलच एक समाज बांधव
     ✍️नितीनराजे अनुसे
         जागा हो धनगर

Tuesday, 17 February 2015

दिव्य प्रकाशरुपी कंदील अर्थातच क्रांतीची मशाल : नितीनराजे अनुसे

ब्लॉग दि. १७ फेब्रुवारी २०१५

        चिकीत्सकपणे अभ्यास केल्यास असे दिसून येईलकी 21 व्या शतकात सुद्धा धनगर
समाजाची अवस्था अजूनही अत्यंत दयनीय
स्वरूपाची आहे.
विज्ञानामूळे माणसाच्या जिवनामध्ये अनेक बदल
घडत गेले, माणसाने समूद्राची खोली
गाठली, पृथ्वीच्या पोटातील विवीध
रसायनांचा शोध लावला,
आकाशावरती साम्राज्य
मिळवले आज माणूस चंद्रावर आणि मंगळावर
सुद्धा पोहचला पण माझा धनगर समाज अजूनही
अंधारतच गुरफटलेला आहे. अंधश्रद्धेवरती विश्वास
ठेवणार्या या माझ्या समाजाला
तेजस्वी प्रकाशाची गरज आहे.
'खरंतर झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचं
सोंग(नाटक) करणार्यांना जागे
करता येत नाही' अशी एक म्हण आहे.
पण माझ्या मतानूसार 'सोंग
करणार्यांना सुद्धा लाथ घालून जागे करता येते'.
धनगर समाज अजूनही निद्रावस्थेत आहे.
अज्ञानाचं घोंगडे पांघरूण हा आजचा तरून
सुद्धा गाढ झोपी गेलेला आहे. मग
या समाजाला जर यशाच्या शिखरापर्यंत
पोहचायचं
असेल तर काही गोष्टींचा अवलंब केल्यास समाज
निश्चित स्थळी पोहचू शकतो हे माञ
नक्की....
त्यासाठी समाजातील तरून
पिढीला निद्रावस्थेतून जागे करा,
जे जागे आहेत/होतील त्यांना उठवून उभा करा,
समाजाच्या हक्कासाठी आणि समाजावरती
होणार्या अन्यायाच्या विरोधात लढण्यास
समर्थ करा, त्या तरूनांना बोलतं करा आणि
चालतंही करा करा,
पण पाऊल पुढे टाकण्याच्या अगोदर प्रत्येक
तरूनाच्या हातात एक ज्ञानरूपी कंदील
द्या जेणेकरून त्या तेजस्वी प्रकाशामध्ये
तो स्वतःचा मार्ग शोधून समाजाला
योग्य दिशा दाखवून देइल.
ज्ञानशक्तीच्या जोरावर पारंपारिक
आणि रूळलेल्या मार्गाचा अवलंब न करता नविन
मार्ग स्विकारेल
आणि स्वतःच्या पाऊलखूणा पाठीमागे राहतील
अशा प्रकारे
समाजामध्ये स्वतःची एक नविन ओळख निर्माण
करेल असच त्या तरूनांना प्रेरित करा.
या जिवणाच्या वाटेवर काही अडथळे येतील,
काही समस्या उद्भवतील पण धीर न खचता
यावरती मात करूनच पूढे जायला लागेल कधी-
कधी त्या वाटेवर चालताना तरूनांना
दगड-धोंडे आडवे येतील काटेकूटे आडवे येतील, ऊन
वारा पाऊस या सर्वांवर मात करून
पूढे जायला शिकवा.
'जर यशाच्या शिखरापर्यंत पोहचायच असेल तर
अपयशाच्या टेकड्या पार कराव्याच
लागतात'.
या प्रवासात जेव्हा डोंगर-टेकड्या आडव्या येतील
तेव्हा जे अशक्त आहेत जे डोंगर
चढू शकत नाहीत त्यांना स्वतःच्या पाठीवर
घ्या आणि डोंगर पार करा, जिथे
समूद्र-नद्या आडव्या येतील
तेव्हा ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी
पोहणारांच्या पाठीवर बसा आणि समूद्र पार
करा.
अशा प्रकारे जर धनगर समाजाने एकमेकांची सुख-
दूःखे वाटून घेतली तर या जिवनाच्या
शर्यतीत फक्त आपण आणि आपणच
जगाच्या सर्वात पूढे राहू.....!
त्यावेळी आपल्या पूर्वजांना एक
प्रकारचा विलक्षण आनंद होईल आणि सर्वजन
बोलतील....
"शाब्बास रे माझ्या वाघांनो !!!
'धनगर' असल्याची तुम्ही खरी लाज राखली"
"काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि
गुजरात पासून आसामपर्यंत
हिमालयाच्या पर्वत रांगेतून,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यातून..
एकच नाद घूमूदे,
धनगर सारा एक होऊदे".
    ✍️नितीनराजे अनुसे
 अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
   +918530004123

धनगर समाज काल आज आणि उद्या : नितीनराजे अनुसे

           परकीय शत्रुंच्या छाताडावर पाय ठेवून १८०० वर्षे या हिदुस्थानावर आपली दहशत निर्माण करत राज्यकारभार करणारा आणि राजेशाही थाटात मिरवणारा माझा धनगर समाज आज निद्रावस्थेत आहे/गाढ झोपी गेला आहे.
           एकेकाळी राजा समाज असणारी आमची औलाद आज गुलामगीरीत का वागतेय??? मनगटाच्या जोरावर तलवारीने वार करून अखंड भारत एका छत्रीखाली आणणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या इतिहासाचे आम्ही मानकरी, अटकेपार झेंडा गाढणाऱ्या राजे मल्हारराव होळकर यांच्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही, २८ वर्षे दिल्लीच्या तख्तावर बसून हिदूस्थानाच्या विशाल भू-भागावर राज्य करणाऱ्या रणरागीनी राजमाता अहिल्याबाई होळकरांचे मावळे आम्ही, शुरवीर यशवंतराव होळकरांचे वारसदार आम्ही असे असताना तळपत्या तलवारीचा अन् आमच्या नसानसातून वाहणाऱ्या सळसळत्या रक्ताचा जणू काय आम्हाला विसरच पडलाय... धनगर समाजाचं नाव घेताच चळचळ कापणाऱ्या जाट रोहिल्यांना यमसदनी पाठवणारी आमची औलाद आज घोंगडी पांघरून गाढ झोपी कशी काय गेली? लाज वाटतेय माझी मला अरे मी कोणत्या समाजात जन्माला आलोय? ज्या समाजाला आमचाच आमच्या पूर्वजांनी रचलेला जर इतिहासच आठवत नसेल तर आम्ही काय खाक इतिहास घडवू शकतो?
आज देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली पण आमच्याच हक्काच्या आरक्षणासाठी आम्हाला भिक मागावी लागतेय ही सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ठ म्हणावी लागेल. अरे जिथं घोंगड्याच्या इशाऱ्यावर वरूणराजा सुद्धा बरसतो मग आपल्या हक्काच्या  आरक्षणासाठी प्रस्थापीतांच्या पाया पडायची वेळ तुम्हा-आम्हावर का आली? आपल्यातच जर एकी असती तर आज त्या प्रस्थापीतांवर आमचे बूट चाटायची वेळ आली असती. पण मराठा आणि ब्राह्मण हे दोन्ही समाज असे आहेत की धनगर समाजाला कधीच वरती येवू देत नाहीत आणि आपणही आपल्यातच एकमेकांची डोकी फोडत बसलो तर आपली मर्कटलीला पाहत बसणारे मराठा-ब्राह्मण आपल्याला कधीच सत्तेवर येवू देणार नाहीत.
         म्हणून बांधवांनो आजतरी एकत्र या नाहीतरी उद्याची आपली भावी पीढीसुद्दा तुमच्या-आमच्या सारखीच गुलामगीरीत जगेल.
आपलाच एक समाजबांधव.
     ✍️नितीनराजे अनुसे
         जागा हो धनगर