आज १ मे महाराष्ट्र व कामगार दिन..,
गावोगावी तसेच शहरात आणि प्रत्येक विभागात फ्लैक्स वरतून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसला तसेच आज दिवसभर एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्याच फोनवरतून तसेच सोशल मिडीयावरतून शुभेच्छा देण्यात आल्या पण कामगार दिनाच्या शुभेच्छा मात्र क्वचितच लोकांनी दिल्या.
महाराष्ट्र व कामगार दिनानिमीत्त एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात त्याबद्दल माझं काही दुमत नाही पण याव्यतिरीक्त इतर काही गोष्टींचा अभ्यास करुन त्यावरती विचारविनीमय करणे मला तितकच योग्य वाटते. आज प्रामुख्यानं महाराष्ट्र दिन पण "महाराष्ट्र" हा शब्द नक्की आला कोठून त्याचा थोडक्यात आढावा घेवूया...
खरंतर महाराष्ट्र या शब्दाची सुरवात मरहट्टी या शब्दापासून होते. कर्नाटक मधील मरहट्टी लोक (म्हणजेच शेळ्या-मेंढ्या पाळणारे पशुपालक) त्यांना हट्टीजन म्हणून ओळखले जाते. कन्नड मधील हे हट्टीजन लोक म्हणजेच शेळ्या मेंढ्या पाळणारा धनगर समाज आहे आणि हे मरहट्टी जी भाषा बोलायचे त्यांस "मरहट्टी" भाषा व कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन मरहट्टी चा "मराठी" हा प्रचलित शब्द तयार झाला. हट्टीजनांचे म्हणजेच धनगरांचे राष्ट्र (मरहट्ट्यांचे राष्ट्र = महाराष्ट्र) उदयास आले. पूर्वीच्या सातवाहन या धनगर जमातीचा या राष्ट्राच्या जडण-घडणीत सिंहाचा वाटा असल्याने हे धनगरांचे राज्य निर्माण झाले व मरहट्ट्यांची मरहट्टी भाषा तसेच मरहट्ट्यांचे राष्ट्र (धनगरांचे राष्ट्र) निर्माण झाले.
महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई हा प्रांत महाराष्ट्र राज्यात यावा म्हणून ज्या १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं गेलं त्या शहिदांना विनम्र अभिवादन करतो पण स्वतंत्र महाराष्ट्र स्थापण करुन माझ्या मरहट्टी (मराठी) बांधवांना महाराष्ट्राच्या छाताडातून वेगळं केलं गेलं याचंच दु:ख मनोमन होतंय. सदरच्या मध्यप्रदेश राज्यातील इंदौर हे संस्थान जिथं माझे मरहट्टी बांधव वास्तव्य करत असताना स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीनंतर त्यांना मध्यप्रदेशात रहावं लागतंय आज तिथे मराठी भाषा वापरणारे वास्तव्य करताहेत त्याशिवाय कर्नाटकमधील माझ्या बांधवांनादेखिल महाराष्ट्रापासून अलिप्त ठेवण्यात आलं मग आज महाराष्ट्र दिनानिमीत्त मी आनंद साजरा करू की दु:ख व्यक्त करु या संभ्रमात रहावं लागतंय. म्हणून शुभेच्छा द्यायच्या की नाहीत हे कोडं पडलं आहे.
मी मराठी असा डंका पिटणार्या आणि मराठीचा (मरहट्टीचा) उदो 'उदो' करून 'राज'कारण करणार्या त्या परप्रांतीयांना माझ्या मरहट्टीची(धनगर समाजाची) ताकद काय कळणार?? मी मराठी मी मराठी असं तोंड वरती वरून सांगताहेत पण माझ्या मराठी (मरहट्टी=धनगर) बांधवांना आरक्षण द्यायची वेळ येते त्यावेळी त्यांच्या म्हणजेच मी मराठी (मी मरहट्टी=मी धनगर) बोलणार्यांच्या तोंडातून ब्र देखिल निघत नाही तसेच या मरहट्टी समाजाला आरक्षण मिळू अशी भाषा करणारे ते भट आणि त्या प्रस्थापित जाती आहेत मग जनतेला तुम्ही किती दुधखुळं बनवता याचा अंदाज तुम्हाला येत नाही. माझ्याच मरहट्टी च्या नावावर राजकारण करू इच्छिनार्यांना २०१४ च्या निवडणूकांमध्ये पराभवाची धूळ खावी लागली ती मराठी (मरहट्टी =धनगर) समाजामुळेच...
महाराष्ट्र राज्यातील परिणामी भारतातील क्रमांक एक वरती असलेल्या धनगर समाजाला अजून स्वतःची ताकद काय आहे याचा अंदाज आलेला नाही. फक्त महाराष्ट्र राज्यात एकूण ५२ पोटजातींमध्ये धनगर समाजाची विभागणी झाल्याने खरी धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे याचे अनुमान काढणं तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत अनेक पोटजातींमध्ये विभागलेला मरहट्टी म्हणजेच धनगर समाज एकत्रित येत नाही. पण या राज्यकर्त्यांनी मी मराठी मराठी करून काय दिवे लावले होते हे तर सर्वांना ज्ञात आहे. उलट माझ्या मरहट्टी समाजावरती घोर अन्याय केला आहे. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी लढलेले १०५ हुतात्मे हे मरहट्टीच होते पण त्यांच्या कुटूंबीयाकडे देखिल दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसून येते पण राज्यकर्त्यांना डिंडोरा पिटण्याशिवाय दुसरे तिसरे उद्योग नाहीयेत स्वताचे नाव झालं म्हणजे बस् बाकीचे कसे का असेनात अशी त्यांची वृत्ती दिसून येते संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात मरहट्टी (मराठी) असलेल्या धनगर समाजाची लोकसंख्या अव्वल स्थानावर असून देखिल प्रस्थापित भट जातींनी मरहट्टी लोकांना वरती येवू दिले नाही म्हणजेच हापापाचा माल गपापाला असंच म्हणायची वेळ आली आहे.
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment