Sunday, 22 February 2015

शेवटी हारलाय स्वाभिमान....

आज निंबवडे ता.आटपाडी जि. सांगली येथील पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शेतकरी पैनल चा पराभव झाला. खरंतर निंबवडे ग्रामपंचायतीवर पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्चस्व आहे पण  पडळकर साहेब अन जानकर साहेब यांच्यातील गैरसमजूतीमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्यामुळे निंबवडे वि.का.स. सोसायटी गमवावी लागली.तिथं आज ना हरलेत जानकर साहेब नाही हरलेत पडळकर साहेब.
आज हरलाय निंबवडेतल्या प्रत्येक मनामनातला स्वाभिमान.
आरं जिथं स्वाभिमान गहाण टाकला जातो तिथं काय खाक विजयाची अपेक्षा करायची??? आज रासपची हार नाही झाली नाही भाजपची कारण आज इथं फक्त विकला गेलाय स्वाभिमान. आणि आज स्वाभिमान विकला गेल्याने पुन्हा एकदा मक्तेदारीचा विजय झालाय. जिथं मतं विकत घेवून विजयोत्सव साजरा केला जातो, तिथं स्वबळावर लढण्याची त्यांच्यात धमक नसते. आणि स्वबळावर निवडून यायला जिगर लागते अन वाघाचं काळीजही लागतं.
आज जो विजय झाला तो पैशाच्या मस्तीचा अन स्वाभिमान दुसर्यांच्या दारात विकणार्या सर्वसामान्य जनतेचा झाला.
हार पचवायला शिकायचं असतं हे आम्हाला पण माहित आहे, पण जिथं आम्ही स्वाभिमानानं आणि स्वबळावर लढतो तिथं आमची कोणीच हार करू शकत नाही आणि तिथं आम्ही ताठ मानेनं जगतो कोणाच्या गुलामगीरीत नव्हे हेही लक्षात असायला पाहिजे.
-@नितीनराजे

No comments:

Post a Comment