झोपलाय हो माझा धनगर समाज शांत झोपूद्या. गाढ निद्रावस्थेत निपचित पडलाय उगाच डवचू नका. कशाला उगंच बोंबाबोंब करताय?? अहो ज्याला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार आहेत???
उगाच व्हाटसप वरतून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे??? जिथं स्वाभिमान गहाण टाकून प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आणि प्रस्थापितांचे बुट चाटायची सवय लागलेल्या समाजातील दलालांना कीती समजावून सांगणार??? त्या दलालांना स्वतःच्या स्वारथासाठी समाजाचे बाजारीकरण करायचं एवढंच माहीत आहे. त्यांना पैशाची तलप लागली आहे मग ते प्रस्थापितांकडुन लाखो रुपये घेवून येतात अन शे-दोनशे रूपये देवून सर्वसामान्य जनतेला आणि दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवलेल्या गोरगरीब समाजाला भुलवायचं काम करताहेत.
आम्ही मात्र व्हाटसप वरती समाजाला एकत्रित करण्याच्या बढाया मारतोय.
पण दिवसेंदिवस समाजाला भुलवणारे दलाल मोठे होत चाललेत अन रानमाळावर दगड-धोंड्यातून काटे-कुटे तुडवणारा माझा माय-बाप अजून अज्ञानीच आहे. त्यांना खरं राजकारण माहीत नाही. मग व्हाटसप आणि फेसबुक वरतून आम्ही समाजात काय परिवर्तन करू शकतो.???
जिथं लोकांची मनं बदलली जात नाहीत तिथं आम्ही काय बदल घडविणार??? आज धनगर समाजाला एकमेकांच्या विरोधात लढायला प्रवृत्त केले जाते तिथं माझ्या धनगर समाजाला कधीच वरती येवू द्यायचं नाही हा प्रस्थापितांचा उद्देश्य आमच्या ध्यानात कधी येणार??? अरे पण प्रस्थापितच नव्हे तर आज धनगर समाजातीलच वरीष्ठ नेते एकमेकांची जिरवण्यासाठी राजकारण करताहेत कीती लज्जास्पद बाब आहे ही.
मला त्यांची नावे घ्यायची नाहीत अन त्यांना कळालेही असेल.
आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी असला तर प्रत्येकाला वाटतंय आरक्षण मिळावं पण त्याचं श्रेय स्वतःच्या पारड्यात पडावं ही कटूनीती धनगर समाजातील नेत्यांची झाली आहे त्यामुळे प्रस्थापितांना दोष देण्यात अर्थ नाही. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही म्हण माझ्याच धनगर समाजातील नेत्यांना वापरावी लागेल. मग तिथं कोण लहान असेल अथवा मोठा.
धनगर समाजातील नेत्यांना वाटत असेल की धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे तर ज्या पक्षात ज्या संघटणेत आज तुम्ही समाजाची चमचेगीरी करताय त्या त्या पक्षाचा तुम्ही राजीनामा द्या अन पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून मंत्रालय गाठा तुम्हाला आरक्षण कोण देत नाही तेच बघतो.
मग कोणी भाजपचा असेल शिवसेना, माकप, भाकप, शेकाप, राष्ट्रवादी असेल कोंग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असो शिवसंग्राम असो जनसंग्राम असो अथवा जनता दल असो त्या त्या पक्षातील धनगर समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे की जर तुम्ही धनगर असाल आणि जर तुमच्या नसात धनगरांचं रक्त सळसळत असेल तर प्रत्येकांनी राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या नाहीतर आरक्षणाच्या फालतू आणि पोकळ बडबड करत बसू नका.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
आपलाच समाजबांधव
【नितीनराजे】
@【जागा हो धनगर】

No comments:
Post a Comment