आज धनगर समाजाची अशी अवस्था झाली आहे की सांगायला सुद्धा किळस वाटतोय. तुम्ही माना अगर न माना पण जणू काय मंदिरातील घंटा 'कोणीही या अन् वाजवून जा' असंच झालय माझ्या समाजाचं. खरं सांगितलं तर बरं वाटत नाही अन् बरं सांगीतलं तर खरं वाटत नाही मग खरंबरं करत करत कुरबूर व्हायला सुरवात होते हे मात्र नक्की.
ज्या समाजाला स्वतःच्या इतिहासाचा विसर पडलाय ते काय इतिहास घडवणार? अहो सळसळत्या रक्ताच्या आम्ही औलादी, पोलादी छाताडाची ढाल करून मनगटाच्या जोरावर तलवारीने सपासप वार करून दुश्मनांना चारी मुंड्या चित करणार्या धनगर समाजाच्या जातीत जन्माला आलेल्या महापुरुषांचे आम्ही वारसदार, एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज गुलामगीरीत जगतेय.
आरं शोभतंय का तुम्हाला?? आरं तुमचा इतिहास उलघडून बघा एकेकाची काळीजं चार्रकन चिरुन जातील असा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास माझ्या समाजासमोर मांडायचा जास्तीत प्रयत्न करा.
माझ्या धनगर समाजाची आजची अवस्था बघून माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते नसानसातून रक्त सळसळू लागते, डोळ्यासमोर माझ्या महारुषांचा इतिहास उभा ठाकतो, हाताच्या मुठी आवळल्या जातात पण "काश मेरे पास अगर तलवार होती तो... ?" असे शब्द नकळतच तोंडातून बाहेर पडतात.
म्हणून मला आज तलवाररुपी शब्दांचा वापर करावा लागतोय, आज माझ्या हातात जी लेखनी आहे ती एक जणू काय तीक्ष्ण धार असलेली माझी तलवार आहे. माझ्या महापुरुषांनी तलवारीचा वापर केला होता तो आमच्यावरती अन्याय करणार्या दुश्मनांची डोकी कापायला केला होता पण मी आज शब्दरुपी तलवारीचा वापर माझ्याच समाजाची डोकी गीरवायला करतोय. मला माझ्या समाजाची डोकी नांगरायची आहेत, शेतीची मशागत करायची असेल जमिनीचा पोत वाढवण्यासाठी जमिन कसदार करावी लागते म्हणूनच समाजामध्ये स्वाभिमान निर्माण करायचा असेल तर आज मला धनगर समाजातील समाजबांधवांची डोकी नांगरावी लागतील तरच सक्षम, सतर्क आणि सुसंस्कृत समाज मला तयार येईल ही माझी दूरदृष्टी असून माझ्या समाजाला राजेशाहीचा थाट मिळवून द्यायचाय. म्हणूनच मी त्या दिवसाची वाट पाहतोय की "दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पिवळा फडकण्याची" त्याचदिवशी राजा सम्राट अशोकाचं राज्य आल्याचं सार्थक होईल नाहीतर गिधडांच्याच भितीनं आपल मरण वाचवत फिरायची वेळही दुर नसणार आहे. ज्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पिवळा फडकेल त्यादिवशीच पाणिपत मध्ये पराभूत झालेल्या मराठ्यांना अन् पाणिपतच्या मातीत रक्त सांडलेल्या शुरवीरांनाखरी श्रद्धांजलि मिळेल. या युद्धात बिनबुडाचे आरोप माझ्या मल्हाररावांवरती झाले त्या आरोप करणार्या जातिवादी गिधडांना एकप्रकारची चपराक असेल. तो दिवस पाहण्यासाठी अन् माझ्या समाजावरती अन्याय करणार्यांच्या छाताडावरती थय्या थय्या नाचायचं माझं स्वप्न आहे त्यासाठीच मी लढतो आहे प्रसंगी मला रक्त सांडावं लागलं तरी बेहतर. मी कोणाच्या बांधीलकीत जगत नाही, आज मी ताठ मानेनं जगायला शिकलोय तुम्हीही ताठ मानेनं जगा नायतर तुमच्यावरती कोणीही थुंकायला अन् भुंकायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.
उद्याच्या पीढीला जर कोणाच्या गुलामगीरीत जगू द्यायचं नसेल तर आज तुम्ही स्वाभिमानाने जगा एकत्र या अन् छाती ठोकून सांगा की मी धनगराची औलाद आहे. "वेळ आल्यास मरण पत्करेल पण कोणाला शरण जाणार नाही" हीच माझी नीती आहे.
जर आज मला कोणी हाक दीली तर क्षणमात्रही विचार न करता मी त्याच्या मदतीला धावून जाईल कारण उद्या जर तीच वेळ माझ्यावरती आली तर मला कोणासमोर हात जोडायची गरज पडणार नाही त्यावेळी माझ्यावरती होणारे वार झेलायला माझेच शेकडो समाजबांधव ढालीसारखे उभे राहतील.
प्रत्येकाने जर हा विचार केला अन् तो आमलात आणला तर या देशावर फक्त आणि फक्त धनगर समाजच राज्य करेल ही दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
- नितीनराजे अनुसे
- अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
- ७६६६९९४१२३
- nitsanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment