१८ मार्चच्या मोर्चाबद्दल दुमत झालय असं मला खुपजनांकडून ऐकायला मिळालं तर काहीजनांनी मला फोन करून विचारलं की नेमकं करायच काय???
【१】पहिलं मत असं की जर १८ मार्च रोजीचा जो मोर्चा आहे त्यात सहभागी झालो तर मी म्हणतोय असंच तो मोर्चा राष्ट्रवादी तर्फे आहे आणि धनगर समाजाला माझ्याच समाजातील दलाल (तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे मी त्यांची नावं घेत बसणार नाही) हे राष्ट्रवादीच्या दावणीला घेवून चाललेत.
【२】दुसरं मत असं की जर मोर्चामध्ये सहभागी नाही झालो तर तिथं धनगर समाजाची एकी दिसून येणार नाही.
मग नक्की काय करायचं ??? असाच प्रश्न समोर येतो, त्यावर मला विश्लेषण द्यायला आवडेल...
१)बांधवांनो पहिलं मत हे १००% बरोबर आहे कारण मोर्चाचं आयोजन हे प्रकाश आण्णा शेंडगेंनी केलंय. प्रकाश आण्णा शेंडगे सध्या राष्ट्रवादी मध्ये आहेत पण भाजप मध्ये आमदार असताना त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कीती वेळा विधानसभेत मांडला होता. यावर विचारविनीमय करावा. खरंतर त्यावेळी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच सरकार होते. मग त्यावेळी प्रकाश शेंडगेंनी धनगर समाजाबद्दल कधी आवाज उठवला होता का?? राष्ट्रवादी आणि कोंग्रेसने या गोष्ठीची कीती शहानीशा केली होती??? पण २०१४ च्या विधानसभेसाठी अन्यवेळी भाजप मधून प्रकाश शेंडगेंचे तिकीट कापलं गेल्याने त्यांनी धुर्त आणि लबाड असलेल्या राष्ट्रवादीमद्ये प्रवेश केला.
प्रकाश शेंडगेंना देखिल माहीत होतं की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे असे असताना देखिल प्रकाश शेंडगेंनी राष्ट्रवादीत का प्रवेश केला?? आण्णासाहेब डांगेदेखिल राष्ट्रवादीत आहेत, दत्ता मामा भरणे सुद्धा राष्ट्रवादीचेच..
२)मग दुसरं मत अशाप्रकारे आहे की जर मोर्चामध्ये सहभागी झालो नाही तर तिथं धनगर समाजात एकी दिसणार नाही.
समाजाची एकी असायला पाहिजे असं जर तुमचं मत असेल तर मग वेगवेगळ्या पक्षात स्वताची भाकरी भाजून घेणारे नेतेच एक होत नाहीत तर मग तुम्ही आम्ही सामान्य माणसं कशी काय एक होणार???
जर माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येवून हा आरक्षणाबाबतचा मोर्चा यशस्वी करूयात. पण धनगर समाजातील नेते असे तसे एकत्र येणार नाहीत, कारण प्रत्येकजण स्वतःची कातडी वाचवायला बघतोय. काहीजन म्हणतात की ते स्वार्थासाठी करत नाहीत त्यांच्याकडे सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ति आहे. आणि ते आज फक्त आपल्या समाजासाठी लढताहेत.
माझं त्यांना सांगणं आहे की बाबांनो एवढी संपत्ति कमवायला तुम्ही कोणाच्या शेतात रोजगारानं गेला होता का??? जी तुम्ही संपत्ति कमवली आहे ती धनगर समाजाच्या नावाखाली कमवलीय समाजाची दलाली करून चमचेगीरी करून समाजाला बळीचा बकरा बनवून प्रस्थापितांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही केलं त्यावेळीच तुम्ही सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ति कमवली. पण आजचा माझा धनगर समाज आयुष्यभर शेळ्या-मेंढ्या राखून, राब राब राबून सुद्धा त्यांचे कधी कधी खायचे वांदे होतात. मग तुम्ही एवढी संपत्ति कमवली कोठून??? समाज तिथंच राहिलाय फक्त नेते मोठे होत गेलेत.
तुम्ही जर स्वार्थासाठी समाजाचं नेतृत्व करत नसाल तर मग राजीनामं द्यायला काय होतंय???
तुम्हाला निस्वार्थीपणे लढायचं असेल तर मग प्रस्थापितांची चमचेगीरी दलाली सोडून तुम्ही पिवळ्या झेंड्याखाली का एकत्र येत नाही???
त्या त्या पक्षाचे राजीनामं का देत नाही???
असं काय दडलंय त्यात तुम्ही आपापल्या पक्षाला राजीनामं द्यायला तयार होत नाही???
वेगवेगळे झेंडे उरावर घेवून मिरवण्यापेक्षा महात्मा फुलेंनी दिलेला समतेचा पिवळा झेंडा घ्यायला तुम्हाला लाज वाटतेय का???
ज्यादिवशी तुम्ही सर्व नेते त्या त्या पक्षाचं राजीनामं देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र याल त्यावेळीच तुम्ही निस्वार्थीपणानं माझ्या समाजासाठी लढू शकता अन्यथा माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाची फसवणूक करू नका.
आज एक उठून म्हणतोय आरक्षण पाहीजे उद्या दुसरा म्हणतोय परवा तिसरा असंच जर आरक्षण मागत बसला तर तुमच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या आरक्षणाचीच भिक मागत बसतील.
राजीनामं न देता जर तुम्ही १८ मार्चला विधानभवनार जाल त्यावेळी तुमच्यासोबत ठरावीकच लाचार लोक मोर्चात सामील होतील...
आणि जर सर्व धनगर समाज एकत्रित आणायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नेत्यांनी आजच एकत्र या पण असं तसं नव्हे स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितार्थ त्या त्या पक्षाचे झेंडे पायदळी तुडवा आणि राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याचे मानकरी बना अन्यथा भंडार्याची शपथ माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचं नेतृत्व करायच्या भानगडीत पडू नका.
आम्ही आमचं नेतृत्व स्वतः तयार करू....
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे
@ जागा हो धनगर
(+917666994123)
(Facebook.com/jagaho.dhangara)
(nitsanuse.blogspot.com)
यावरती आपल्या प्रतिक्रिया कळवा...

No comments:
Post a Comment