मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मला कोणावरती छाप पाडायची आहे म्हणून मी लिहीत नाही, मी काव्य करतो त्यातून मी काय तुम्हाला भुरळ पाडायची म्हणून करत नाही. पण मनात शल्य बोचतंय ते ज्यांनी आपल्या समाजाचं आजपर्यंत वाटोळं केलं आणि आज त्यांच्याच सांगण्यावरून मोर्चा काढला जातोय.
आदरणीय प्रकाश आण्णांनी माझा बांध रेटलाय म्हणून मी मोर्चाला विरोध करतोय अशातला भाग नाही. मी काय कोणत्या बीजेपी वाल्यांची चमचेगीरी करत नाही. किंवा कोणाच्या बापाचं मी काही खाल्लय म्हणून मोर्चाला विरोध करतोय अशातला विषय नाही. जे बीजेपी मद्ये नाहीत तेच दलाल आहेत असंही मी बोललो नाही, पण समाजासाठी त्या त्या पक्षाची दलाली सोडून समाजासाठी एकत्रित यावे म्हणून मी संघर्ष करतोय, झटतोय आणि झगडतोय.
आरक्षण आम्हाला पाहिजेच पाहिजे, मग ते आरक्षण कसं मिळवायचं ते पण आम्हाला चांगलंच माहीत आहे.
आज धनगर समाजाचा पुळका येतोय म्हणून तुम्ही मोर्चा काढत नाही तर धनगर समाजाच्या विश्वासास पात्र नसलेल्या पवारांचं राजकीय धोतर सांभाळायचं म्हणून तुम्ही मोर्चाचं नेतृत्व करताय पण त्या रथाचा सारथी दुसरा तिसरा कोणी नसून ६५ वर्षे धनगर समाजाचा विश्वासघात करणारे शरद पवार आहेत म्हणून आम्ही मोर्चाला विरोध करतोय.
मला फोन येवू लागले की सर्व धनगर नेत्यांना विचारलं होतं पण त्यांनी नकार दिला कारण ते सत्ताधारी आहेत. जानकर साहेबांनी पण नकार दिला असं मला ऐकायला मिळालं. धनगर समाजातील नेत्यांना न विचारता मोर्चाचं आयोजन केल्यानंतर जर तुम्ही धनगर समाजातील नेत्यांना आवातनं द्यायला जाताय म्हणजे "वरातीमागून घोडे" असंच म्हणावं लागल.
आणि बरोबर आहे जानकर साहेब या मोर्चाला नकार देतिलच कारण २५ वर्षापासून हा माणूस घरादाराचा त्याग करून समाजासाठी धडपडतोय त्यावेळी जानकर साहेब तुम्हाला दिसले नव्हते का?? माढा लोकसभा मतदारसंघात जानकर साहेब निवडणूक लढवत होते त्यावेळी वर्तमानपत्रातून आणि न्यूज चैनल वरतून बातम्या धडकायच्या की
"माढा मतदारसंघात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या विरोधात मा. महादेवजी जानकर साहेब निवडणूक लढत आहेत, जानकर साहेब हे एक धनगर समाजाचे नेते आहेत."
मग धनगर समाजाचा उगंच पुळका आणनारे त्यावेळी काय शेण खात होते का??? त्यावेळी तुम्हाला धनगर समाज आठवला नाही तर पवारांचं राजकीय धोतर सांभाळत बसला आणि आज तुम्हाला धनगर समाज आठवायला लागला. नुसतंच व्हाटसप आणि फेसबुक वरतून विकासाच्या न् आरक्षणाच्या पोकळ बढाया मारणार्यांनो तुम्ही कधी या गोष्टीचा अभ्यास केलाय का??
समाज संघटन करायचं आहे तर मग ज्यांनी आजपर्यंत धनगर समाजाचा वापर करून घेतला आणि समाजाचं वाटोळं केलं त्या बारामतीकरांच्या सल्ल्यानं मोर्चा आयोजित करायचा अन् पुन्हा धनगर समाजातील नेत्यांना आमंत्रण द्यायचं हीच निर्णयप्रक्रिया आहे का?? त्याअगोदर धनगर समाजातील नेत्यांनी एकत्र बसून जर हा मोर्चा आयोजित केला असता तर आज लाखच काय १५ लाखाच्या वरती धनगर समाजाला मुंबई मध्ये आणलं असतं हे ओपन चैलेंज मी त्याचवेळी दिलं होतं.
मला काहीजण म्हणाले तुम्ही काय स्वतःला चाणक्य समजता का?? त्यांना सांगू इच्छितो की मी काय स्वतःला चाणक्य समजत नाही पण कोणत्याही ऐर्यागैर्याला न जुमानता चाणक्यासारखे माझेही विचार समाजासमोर मांडायचं धाडस मी करतोय.
मी धनगर समाजाचं विभाजन करतोय असंही माझ्यावरती आरोप होऊ लागले. नक्की समाजाचं विभाजन कोण करतंय याचा अभ्यास तुम्ही कधी केला आहात का?? आजपर्यंत धनगर समाजानं एकत्र यावं म्हणून मी संघर्ष करतोय. जर धनगर समाजाचं विभाजन होऊ द्यायचं नसेल तर त्या पक्षातील सर्व नेत्यांना सांगा की तुम्ही आपापले राजीनामे तुमच्या पक्षश्रेंष्ठीकडे द्या. आणि पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित या तरच समाजाचं विभाजन न होता एकत्रिकरण होईल त्यावेळी तुम्ही माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करण्या लायक आहात. अन्यथा तुम्ही माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करु नका. आणि भोळ्या भाबड्या माझ्या धनगर समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही करू नका.
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+917666994123
nitsanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment