अब्रुचे खोबरे व्हावे असाच काही उचित प्रकार आजच्या धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काढलेल्या मोर्चातून दिसून आला. आज धनगर समाजाला चारित्र्यसंपन्न नेतृत्वाची गरज असताना दुसर्यांच्या ईशारावरती नाचनार्या नेत्यांना आज धनगर समाजानं त्यांना त्यांची जागाच दाखवून दिली. कदाचित आरक्षणाऐवजी हेच त्या नेत्यांना सिद्ध करुन दाखवायचं होतं की काय?? हा प्रश्न मला पडलाय... बारामतीच्या मोर्चातून अख्ख्या महाराष्ट्राला धनगर समाजाची ताकद दिसून आली होती. अख्ख्या भारताचं लक्ष धनगर समाजानं केंद्रित करून घेतलं होतं, बारामतीचा मोर्चा हा अनपेक्षितपणेच होता, त्याचं काही आयोजनही केलं नव्हतं तरीही ५,००,००० (पाच लाखांवरती) त्याहून जास्त धनगर समाज स्वखर्चानं बारामतीमध्ये एकवटला गेला होता पण आजचा मुंबई विधानभवनावलील मोर्चा हा पूर्वनियोजित असताना, बारामतीकरांकडून दोन कोटी रुपयांची मदत असूनदेखिल ५०० ते ७०० (मी १०००मानून चालतो) इतकाच समाजबांधव आजच्या मोर्चाला उपस्थित होता. कीती दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.
आजचा मोर्चा वक्रतुंडाच्या कृपेनं आयोजित केल्यानं धनगर समाजानं देखिल मोर्चाकडून तोंड वाकडं केलं.
यामध्ये धनगर समाजाचं काही नुकसान नाही झालं पण ज्यांन या मोर्चाचं आयोजन केलं होतं ज्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं त्या त्या रथी महारथींच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला तो म्हणजे राजकीय संन्यास घ्यायचा.
आज धनगर समाज जागा झालाय समाजामध्ये परिवर्तन घडतंय, विशेषता यूवा वर्ग जागरुक झालाय. आजपर्यंत डोंगर-दर्यातून माळरानावर शेळ्या-मेंढ्या राखणार्या अडाणी/अज्ञानी भोळ्या-भाबड्या माझ्या धनगर समाजाला फसवून लांडग्यांच्या दावणीला बांधायचं काम हे धनगर समाजातील नेते मंडळींनी केलं. शेता-मळ्यात बैलासारखं राब राब राबणार्या माझ्या शेतकर्यांना फसवायचं काम हे दलालांनी केलंय. त्यामुळे धनगर समाजाचे नेते कोण आणि समाजातील दलाल कोण हे आजच्या तरुन पीढीला सांगायची गरज पडणार नाही. आजचा मोर्चा हा धनगर समाजातील नेत्यांच्या विचाराने आणि पुढाकाराने आयोजित केला असता तर आझाद मैदानावर उभं राहायला जागा पुरली नसती. या मोर्चाचं आयोजन केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं होतं तेव्हा त्याच्या दुसर्या दिवसी मी सांगितलं होतं की धनगर समाजातील नेत्यांना जर धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर आपापल्या पक्षाचं राजीनामं द्या आणि पिवळा झेंडा खाद्यावर घेवून मगच तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व करा. जर त्या त्या नेत्यांनी राजीनामं दिलं असतं तर आज १५ लाखाच्यावरती धनगर समाज एकत्रित करण्याची जबाबदारी माझी होती असंही मी सांगितलं होतं. पण हा मोर्चाच बारामतीकरांच्या सांगण्यावरुन आयोजित केला होता त्यामुळं राजीनामं कोणाकडे द्यायचे तिथंच घोडं पेंड खात होतं.
संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून धनगर समाजातील नेत्यांना आणि समाज बांधवांना आवातनं द्यायची वेळ ही बारामतीकरांवरती आली. हीच धनगर समाजाची ताकत आणि हाच विजय आहे. तुम्हाला धनगर समाजासाठी झटायचं असेल झगडायचं असेल तर धनगर समाजातल्या प्रत्येक नेत्यांना, होतकरूंना आणि स्वाभिमानी तरूनांना विचारुनच तुम्ही समाजबद्दलचा निर्णय घ्या, समाजासाठीचा निर्णय हा समाजबांधवांनाच विचारून घ्या बारामतीच्या बोक्याला विचारून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत उलट समस्या वाढत जातील त्यासाठी आजचा अनुभव आयुष्यभर तुमच्या लक्षात राहूद्या.
स्व.बी के कोकरे साहेबांचा राजकीय खून करून माजी मंत्री स्व शिवाजीराव(बापू) शेंडगेना जवळ करुन धनगर समाजाचं नेतृत्व खुडून टाकायचं पाप बारामतीच्या बोक्यानं केलंय हे तुम्हीही नाकारु शकत नाही आणि आज मा.महादेवजी जानकर साहेबांचं वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी धनगर समाजातील नेत्यांना फूस लावायचं राजकारण बारामतीचा बोका करतोय म्हणजे 'काट्यानं काटा काढायचा' हे उघड्या डोळ्यांनी सरळ सरळ दिसून येतंय. त्यांना फक्त जानकर साहेबांचीच भीती वाटतेय असं नाही तर संपूर्ण धनगर समाजाची त्यांना भीती वाटतेय म्हणूनच धनगर समाजाला एका नव्हे तर दोन दोन घोंगडीनं झोपू घाला असं म्हणणार्या यशवंतराव चव्हाणांची ही राजकीय औलाद आहे ते विसरता कामा नये.
राजकारण आणि समाजकारण करायचं असेल तर चारित्र्यसंपन्न नेतृत्व तुमच्या अंगी असायला पाहिजे तरच समाज तुम्हाला सलाम करेल नाहीतर कोणाचेतरी बुट चाटायची सवय तुम्हाला असेल तर समाज तुम्हाला बुटाखाली घ्यायला मागंपुढं बघणार नाही.
तुम्हा सर्वांना माहीत आहेच की घरातील योग्य आणि चांगले निर्णय फक्त आईच घेवू शकते कारण बाजूची बाई मात्र संसारात विष कालवायचा प्रयत्न करते. म्हणून धनगर समाजानं आपली आई ओळखायला शिकलं पाहिजे जर बारामतीच्या बाईच्या नादाला लागाल तर आपल्या पुढच्या शंभर पीढ्या त्यांची धोतरं लुगडी सांभाळत बसतील म्हणूनच म्हणतो बांधवांनो आजतरी एकत्रित या अजूनही वेळ गेलेली नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+917666994123
nitsanuse.blogspot.com
No comments:
Post a Comment