गुपित उद्याच्या मोर्चाचं...
बांधवांनो खूप दिवसांपूर्वीपासून मी सांगत आलोय आणि आजही आवर्जून सांगतोय. उद्या दि.२३ मार्च २०१५ रोजी धनगर समाजाला ST आरक्षणाची आंमलबजावणी व्हावी म्हणून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येतोय. हा धनगर समाज प्रणित मोर्चा नसून राष्ट्रवादी प्रणित मोर्चा आहे.
बांधवांनो हा मोर्चा म्हणजे समाजाविषयी तळमळ आहे म्हणून आयोजित केला नाही तर यामागे खूप मोठं राजकारण दडलय...
धनगर समाजातील वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे जेष्ठ विचारवंत आणि वक्ते/लेखक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत आणि मी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग घेणार नाही. आमचा उघडपणे या मोर्चाला विरोध आहे. आरक्षण आम्हाला हवं आहे पण धनगर समाजातील नेत्यांना डावलून बारामतीकरांच्या सांगण्यावरुन जर हा मोर्चा आयोजित केला जात असेल तर या मोर्चामध्ये आम्ही काय म्हणून सहभाग घ्यायचा.?? आम्ही काय समाजाचं दलाल नाही. आम्ही काय कोणाची भडवेगीरी अन् चमचेगीरी करत नाही.
हा मोर्चा समाजाच्या हितासाठी नाही, समाजाचा पूळका येतोय म्हणूनही नाही तर पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजामुळे पवारांना एकप्रकारचा झटका बसला होता म्हणून भोळ्या भाबड्या धनगर समाजाला फसवून त्यांना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधायचं षडयंत्र रचलं जात आहे. ज्या राष्ट्रवादीने आजपर्यंत तुमच्या आमच्या पोटावरती पाय देवून राजकारण केलं आणि सत्ता हातातून गेल्यावर धनगर समाजाला फसवून आपल्या जाळ्यात कसं ओढायचं हा डाव पवारांनी आखला आणि शेंडगे, डांगे, वडकुते रूपनवर यांसारख्या नेत्यांचा (दलालांचा) वापर करून धनगर समाजाला आपल्याजवळ कसं ठेवता येईल या पवार नीतीचा वापर केला.
बांधवांनो मी पदरचं सांगतोय किंवा माझ्या खिशातलं सांगतोय यातला विषय नाही, तर खरोखर विचार करण्याजोगी गोष्ट आहे. हा मोर्चा धनगर समाजातील कोणत्याही नेत्यांच्या पुढाकाराने आयोजित केला नाही, मोर्चाचं नियोजन करताना मोर्चाचं आयोजन करताना बारामतीमध्ये धनगर समाजातील कीती नेते उपस्थित होते?? आणि कोण कोण होते?? याचा जर विचार केला तर समजेल या मोर्चाची डाळ नक्की शिजतेय नेमकी कुठे...??"
पाठीमागे झालेल्या बारामती येथील आंदोलनाचा अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल की मा.महादेवजी जानकर साहेब हेच धनगर समाजाचं नेतृत्व करत होते. अभ्यासू आणि जिज्ञासु व्यक्तिमत्व तसेच त्यागी नेतृत्व असलेले मा.महादेवजी जानकर साहेब यांच्यामुळे धनगर समाज संपूर्ण ताकतीनिशी एकसंघ होऊन लढत होता. जानकर साहेबांनी बारामतीतून पवार घराण्याला सुरंग लावत आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि शरद पवारांना एक प्रकारचा धक्काच दिला आणि मग पवारांनी जानकर साहेबांचा धसकाच घेतला.
जर धनगर समाजाचं नेतृत्व करून जानकर साहेब पुढे आले तर राष्ट्रवादीला गबाळ गुंडाळावं लागेल या भितीपोटीच २३ मार्चचा मोर्चा शरद पवारांनी राष्ट्वादीमधील धनगर समाजातील चमच्यांना बारामतीला बोलावून आयोजित करण्याचं ठरवलं.
स्व. बी के कोकरे साहेबांनी यशवंत सेनेची स्थापना करून धनगर समाजाला जागं केलं होतं. अखंड धनगर समाज बी के कोकरे साहेबाच्या नेतृत्वाखली एकत्र येत होता त्यामुळे बारामतीत शरद पवारांची गोची झाली होती आणि बी के कोकरे साहेबांचा खून करण्याचं पाप पवारांनी ओढावून घेतलं. तदनंतर यशवंत सेनेची धूरा मा. महादेवजी जानकर साहेबांनी सांभाळली आणि आज यशवंत सेना रासप मध्ये विलीन करुन जानकर साहेबांनी बारामतीमध्ये पुन्हा थैमान घातले आहे. जर जानकर साहेबांनी बारामती काबीज केली तर पवार घराण्याला रस्त्यावर यावं लागल हीच भिती शरद पवाराना वाटत आहे.
जानकर साहेबांचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून पवारांनी जसं बी के कोकरे साहेबांच्या खूनानंतर धनगर समाज पेटून उठल म्हणून शिवाजीराव (बापू) शेंडगे यांनां जवळ केलं तसच जानकर साहेबांचं नेतृत्व पुढे येवू द्यायचं नाही म्हणून प्रकाश शेंडगेंना जवळ करून धनगर समाजाला वरती येवू द्यायचं नाही हे कुटिल राजकारण शरद पवारांकडून केलं जातंय.
उद्याच्या मोर्चात सामील होणार्यांना माझा काही विरोध नाही पण जो मोर्चा धनगर समाजातील नेत्यांना विचारून आयोजित केला नाही तो धनगर समाजाचा मोर्चा कसं काय म्हणायचं??, अथवा धनगर समाजातील सर्व नेत्यांनी एकत्रित बसून जर मोर्चाचं आयोजन केलं असतं तर आम्ही बेधडकपणे मोर्चात सामील झालो असतो. जिथं धनगर समाजातील नेत्यांचा विचार केला जात नाही तिथं आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची काय पर्वा करतील.
धनगर समाजातील बांधवांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सत्ता असताना देखिल शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षणाचा हक्क मिळू दिला नाही ते पवार आज काय आम्हाला हक्क देणार आहेत ??? म्हणून त्यांची गुलामगीरी अन् चमचेगीरी सोडून द्या. ज्यादिवशी धनगर समाजातील सर्व नेते एकत्रित बसून चर्चा करतील आणि आणि आंदोलनाची दिशा ठरवतील त्यादिवशी मी तर प्राणपणाने मोर्चात सहभागी होणार आहे अन् तुम्हीही व्हा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+917666994123
nitsanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment